World Happiness Report 2023: दिवाळखोरीला गेलेला पाकिस्तान सर्वात आनंदी देशांच्या यादीत 103 क्रमांकावर, भारताचा नंबर कितवा?
World Happiness Report 2023: जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फिनलंड पुन्हा अव्वल ठरला आहे. फिनलंड गेली 6 वर्षे सतत या यादीत अव्वल आहे.
World Happiness Report 2023: जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फिनलंड पुन्हा अव्वल ठरला आहे. फिनलंड गेली 6 वर्षे सतत या यादीत अव्वल आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार हा अहवाल गॅलप वर्ल्ड पोलच्या आधारे तयार करण्यात आला आहे. मात्र हा अहवाल आशियाई देशांसाठी निराशाजनक आहे. टॉप 20 आनंदी देशांच्या यादीत एकाही आशियाई देशाचा समावेश नाही. टॉप 20 सर्वात आनंदी देशांमध्ये फिनलंड तसेच डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आणि नॉर्वे सारख्या देशांचा समावेश आहे.
World Happiness Report 2023: कोणत्या आधारावर हे देश सर्वात आनंदी देश म्हणून घोषित जातात?
जगातील सर्वात आनंदी देशांची यादी बनवताना वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टने या देशांतील लोकांची जीवनशैली, त्यांचा जीडीपी, सामाजिक आधार, अत्यल्प भ्रष्टाचार आणि एकमेकांप्रती असलेली प्रेमाची भावना यांचा आधार घेतला आहे. या आधारावर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टने यावेळीही फिनलंडला आपल्या क्रमवारीत शीर्षस्थानी ठेवले आहे. मात्र या अहवालाच्या तळाशी नजर टाकल्यास अफगाणिस्तान 137व्या क्रमांकावर आहे.
World Happiness Report 2023: फिनलंड जगातील सर्वात आनंदी देश
ज्या गोष्टींसाठी अनेक देश संघर्ष करत आहेत, त्यात फिनलंड हा चांगला देश आहे. या देशात जीडीपी, जीवनशैली, शिक्षण, आरोग्य, सामाजिक आधार आणि भ्रष्टाचार हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. उत्तम शिक्षण जे बहुतांशी पूर्णपणे मोफत, उत्तम आरोग्य, उत्तम जीवनशैली आणि अनेक गोष्टी फिनलंडमधील सरकार तिथल्या लोकांसाठी पुरवतात. म्हणजेच तिथले लोक आपले जीवन सुधारण्यासाठी जितके जास्त प्रयत्न करतात तितकेच तिथले सरकारही तिथल्या लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करते. यामुळेच गेल्या 6 वर्षांपासून फिनलंड वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
World Happiness Report 2023: भारत कितव्या क्रमांकावर.
जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत दिवाळखोरीला गेलेल्या पाकिस्तानने भारताला खूप मागे सोडलं आहे. या यादीत पाकिस्तान 103 क्रमांकावर आहेत. तर भारत 136 व्या स्थानावर आहे.
World Happiness Report 2023: टॉप 20 च्या यादीत कोणते देश समाविष्ट आहेत?
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार या यादीत पहिल्या क्रमांकावर फिनलंड, दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावर आइसलँड, चौथ्या क्रमांकावर इस्रायल, पाचव्या क्रमांकावर नेदरलँड, सहाव्या क्रमांकावर स्वीडन, सातव्या क्रमांकावर नॉर्वे, सातव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे. तसेच आठव्या क्रमांकावर लक्झेंबर्ग, नवव्या क्रमांकावर न्यूझीलंड, 10व्या क्रमांकावर ऑस्ट्रिया, 12व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, 13व्या क्रमांकावर कॅनडा, 14व्या क्रमांकावर आयर्लंड, 15व्या क्रमांकावर अमेरिका, 16व्या क्रमांकावर जर्मनी, 17व्या क्रमांकावर बेल्जियम, 18 व्या क्रमांकावर झेक प्रजासत्ताक, 19 व्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आणि 20 व्या क्रमांकावर लिथुआनिया आहे.