Women Health: महिलांनो...पुढची पिढी सुरक्षित ठेवायचीय? तर नववर्षात स्वत:कडे नका करू दुर्लक्ष, 'या' 5 जेनेटिक चाचण्या करून घ्या..
Women Health: आजकाल महिलांमध्ये अनेक गंभीर आजार वेगाने पसरत आहेत. जेनेटिक चाचणीद्वारे, असे आजार शोधले जातात जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातात. त्या चाचण्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
Women Health: आजची बदलती जीवनशैली.. कामाचा ताण.. कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचं संगोपन, अशा अनेक जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडता पाडता अनेक महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. आणि या सर्वांमध्ये महिला त्यांच्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करतात, आजच्या काळात महिलांना स्तनाचा कर्करोग, हृदयाशी संबंधित आजार आणि पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) यांसारख्या अनेक आजारांचा धोका असतो. ज्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या समस्यांवर वेळेवर उपचार मिळण्यासाठी जेनेटिक चाचणी सर्वात महत्त्वाची ठरते. या चाचणीसाठी, तुमची लाळ, केस किंवा रक्ताचे नमुने घेतले जातात. या चाचणीद्वारे, असे आजार शोधले जातात जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातात. त्या चाचण्या काय आहेत ते जाणून घेऊया.
महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक
आजच्या काळात महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण खराब जीवनशैलीमुळे महिलांमध्ये अनेक गंभीर आजार वेगाने पसरत आहेत. यासाठी जेनेटिक चाचणी हा चांगला उपाय ठरू शकतो
फार्माकोजेनॉमिक्स चाचणी
तुमच्यासाठी कोणती औषधे फायदेशीर ठरतील आणि कोणती औषधे घेणे सुरक्षित आहे हे ठरवण्यासाठी फार्माकोजेनोमिक्स चाचणी वापरली जाते. स्त्रिया, विशेषतः, जुनाट आजार बरे करण्यासाठी याचा फायदा घेऊ शकतात.
पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS)
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 13 टक्के महिला पीसीओएसने ग्रस्त आहेत. PCOS ची लक्षणे वजन वाढणे, पुरळ आणि वंध्यत्वापर्यंत असू शकतात. ही जेनेटिक चाचणी रुग्णावर योग्य उपचार करण्यास मदत करते.
हृदयाशी संबंधित आजार
अमेरिकन हार्ट असोसिएशनला असे आढळून आले आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. जेनेटिक चाचणी या आजाराविषयी अचूक माहिती देण्यास मदत करते, ज्यामध्ये हायपरकोलेस्टेरोलेमिया, UFS1 आणि TI MP3 सारख्या रोगांचा समावेश होतो.
स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर)
स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित समस्या लवकर शोधण्यासाठी ही जेनेटिक चाचणी देखील केली जाते. यूएस-सीडीसीच्या मते, सुमारे 10 टक्के स्तनाचा कर्करोग अनुवांशिक असतो, ज्यामुळे वेळेवर उपचार मिळणे खूप महत्वाचे आहे.
न्यूबॉर्न स्क्रीनिंग
ही चाचणी नवजात बाळाच्या जन्मानंतर लगेच केली जाते. यामध्ये नवजात अर्भकाचे अनुवांशिक विकार ओळखले जातात, त्यानंतर हा आजार आढळून येताच त्यावर उपचार केले जातात, जेणेकरून त्याला भविष्यात कोणतीही समस्या उद्भवू नये.
हेही वाचा>>>
HMPV: कोविड-19 नंतर पुन्हा एक मोठे आव्हान? कोरोनानंतर चीनमध्ये 'या' विषाणूचा प्रादुर्भाव, 14 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं संकटात? जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )