सावधान! ब्रेस्ट कॅन्सरचा धोका दिवसेंदिवस वाढतोय, 'ही' लक्षणे वेळीच ओळखा, अन्यथा पडेल महागात
Women Health: महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे. दरवर्षी या आजारामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो.
Women Health: आजकाल अनेक महिलाही चूल-मूल पर्यंत मर्यादित न राहता करिअरनिमित्त घराबाहेर पडत आहेत. अशात कौटुंबिक जबाबदारी, मुलांचे संगोपन, ऑफिसमध्ये कामाचा ताण यासारख्या अनेक गोष्टींमुळे महिला इतरांची काळजी घेताना स्वत:कडे मात्र दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना शारिरीक तसेच मानसिक आजारांचा सामना करावा लागतोय. पण महिलांनो आता दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आजच्या काळात अनेक महिला स्तनाच्या कर्करोगाच्या बळी ठरत आहेत. या आजारावर वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक महिलांचा मृत्यूही होतो. अशा परिस्थितीत, त्याची लक्षणे वेळीच ओळखणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतोय
आजच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे. दरवर्षी या आजारामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो. महिलांमध्ये कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी 15 टक्के स्तनाचा कर्करोग होतो. या आजाराच्या कारणांमध्ये वाईट जीवनशैली सोबतच मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा इत्यादी अनेक सवयींचा समावेश होतो. या आजाराची लक्षणे वेळीच आढळून आल्यास त्यावर उपचार करणे शक्य होऊ शकते.
स्तनाचा कर्करोग म्हणजे काय?
स्तनाचा कर्करोग ही अशी स्थिती आहे, जेव्हा स्त्रियांमधील स्तन पेशी विभाजित होतात आणि वाढू लागतात आणि अनियंत्रितपणे पसरतात. कर्करोग सामान्यतः स्तनाच्या दूध उत्पादन लोब्यूलमध्ये होतो. काही प्रकरणांमध्ये कर्करोगाच्या पेशी स्त्रियांच्या हाताखालील लिम्फ नोड्सपर्यंत, नसांपर्यंत पोहोचू शकतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात पसरतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. जगभरात दरवर्षी अंदाजे 2.1 दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग होतो.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
- स्तनाग्रांचा लालसरपणा.
- स्तनामध्ये कठीण 'गाठ' जाणवणे आणि या गाठी वेदनारहित असतात.
- स्तनाग्रातून रक्त किंवा पू वाहणे
- स्तनाच्या आकारात बदल.
- काखेत गाठ किंवा सूज.
स्तनाचा कर्करोग उपचार
लम्पेक्टॉमी- जेव्हा डॉक्टर स्तनाला इजा झालेली गाठ काढून टाकतात तेव्हा लम्पेक्टॉमी केली जाते.
मास्टेक्टॉमी - मास्टेक्टॉमी दरम्यान, डॉक्टर ट्यूमर आणि कनेक्टिंग टिश्यूसह तुमच्या सर्व स्तनाच्या ऊती शस्त्रक्रियेने काढून टाकतात.
रेडिएशन- या कर्करोगावर उपचार करण्यासाठी डॉक्टर रेडिएशनचा वापर करतात.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो...मासिक पाळीत रक्ताच्या गुठळ्यांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात! ही कारणं असू शकतात, 'या' गोष्टी लक्षात ठेवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )