Women Health : सतत थकवा...रक्तस्त्राव...अचानक वजन कमी...महिलांनो ही लक्षणं तुम्हाला नाही ना? 'या' गंभीर कर्करोगाची सुरूवात ओळखा
Women Health : आरोग्य तज्ज्ञ सांगतात, अनेक स्त्रियांमध्ये हा कर्करोग मासिक पाळी संपण्यापूर्वी होऊ शकतो, म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
Women Health : महिलांनो.. स्वत:कडे लक्ष द्यायची वेळ आलीय. अनेकदा कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन या सर्व गोष्टींमुळे स्व:ताच्या आरोग्याची काळजी घेत नाही, याचा परिणाम महिलांना विविध आजारांना बळी पडावं लागतं. त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेच आहे. कर्करोग हा एक असा गंभीर आजार आहे, जो योग्य उपचारांच्या अभावी प्राणघातक ठरू शकतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी काही महिलांना तर काही पुरुषांना प्रभावित करतात. गर्भाशयाचा कर्करोग (Uterine Cancer) हा यापैकी एक असा कर्करोग आहे, जो स्त्रियांमध्ये एक गंभीर प्रकारचा कर्करोग आहे. काही संकेताव्दारे तुम्ही तो वेळेत ओळखू शकता.
मासिक पाळी संपण्यापूर्वीच होऊ शकतात हे कर्करोग
स्त्रियांमध्ये कर्करोगाची चिन्हे असामान्य आणि अस्पष्ट असतात, बहुतेक कर्करोग मासिक पाळीच्या नंतर होतात. अनेक स्त्रियांमध्ये हे कर्करोग मासिक पाळी संपण्यापूर्वीच होऊ शकतात. काही आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की, वाढत्या वयानुसार सर्व प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अशात कोणत्याही वयात कर्करोग होऊ नये म्हणून या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. गर्भाशयाचा कर्करोग हा असाच एक कर्करोग आहे, जो स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. याची वेळीच ओळख करून त्याचे गंभीर परिणाम टाळता येतात. तो शरीरातील काही बदलांवरून ओळखता येतो. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या काही सामान्य लक्षणांबद्दल जाणून घेऊया, जेणेकरुन तुम्ही वेळेत गर्भाशयाचा कर्करोग ओळखू शकाल.
गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय?
गर्भाशयाच्या कर्करोगाला एंडोमेट्रियल कर्करोग किंवा गर्भाशयाचा कर्करोग असेही म्हणतात. असे घडते जेव्हा गर्भाशयाच्या आतील थरांमध्ये असलेल्या पेशींमध्ये अनुवांशिक बदल होतो आणि पेशी विभाजीत आणि असामान्यपणे वाढू लागतात, ज्यामुळे गर्भाशयात ट्यूमर तयार होऊ लागतो. या ट्यूमरचे नंतर कर्करोगात रूपांतर होते.
गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे
वारंवार लघवी होणे
वारंवार लघवी होणे किंवा बाथरूममध्ये जाण्याची गरज वाटणे हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
असामान्य रक्तस्त्राव
असामान्य रक्तस्त्राव हे एंडोमेट्रियल कर्करोगाचे एक सामान्य लक्षण आहे, जे 90% स्त्रियांमध्ये आढळते. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव किंवा शारिरीक संबंध दरम्यान रक्तस्त्राव होऊ शकतो.
अचानक वजन कमी होणे
जर तुम्ही कोणताही डाएट न करता अचानक वजन कमी करत असाल, तर ते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
सतत थकवा जाणवणे
काही काम केल्यानंतर थकवा जाणवणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला कोणतेही काम न करता सतत थकवा जाणवत असेल तर ते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
भूक न लागणे
सतत पोट भरल्यासारखे वाटणे आणि अजिबात भूक न लागणे हे देखील एक अस्पष्ट लक्षण असू शकते.
ओटीपोटात वेदना
सतत वेदना, अस्वस्थता, गॅस, अपचन, दाब, सूज आणि खालच्या ओटीपोटात पेटके येणे हे देखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो...घरातील जबाबदाऱ्या, काम ठेवा बाजूला! आधी हृदयविकाराच्या झटक्याची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा.. डॉक्टर म्हणतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )