(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Relationship Tips: अटेंशन लेडीज...! प्रत्येक वेळेस नवऱ्याची मर्जी राखणं गरजेचं नाही, स्वाभिमानासाठी पत्नीने या 5 गोष्टीही नाकारल्या पाहिजेत
Relationship Tips : पत्नीने आपल्या स्वातंत्र्याचा आणि इच्छांचा त्याग करून केवळ पतीच्या आनंदासाठी जगावे का? तर उत्तर नाही आहे! अशा 5 गोष्टी ज्याला तुम्ही नकार द्यायलाच हवा.
Relationship Tips : पती-पत्नीचं नातं हे आयुष्यभरासाठी बांधलेलं असतं. नात्यात दोघांनाही समान दर्जा असतो. संसाराच्या गाडीमध्ये पती-पत्नी हे चाकाप्रमाणे असतात, त्यापैकी एक देखील चाक ढासळले, तर संसाराची गाडी बिघडते. आणि सुखाचा मार्ग आणखी खडतर होत जातो. सुखी आणि निरोगी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीचे परस्पर विचार असणे खूप महत्वाचे आहे, परंतु हे प्रत्येक बाबतीत लागू होते का? पत्नीने आपल्या स्वातंत्र्याचा आणि इच्छांचा त्याग करून केवळ पतीच्या आनंदासाठी जगावे का? तर उत्तर नाही आहे! आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत, ज्या प्रत्येक पत्नीने स्वीकारण्यास नकार दिला पाहिजे.
प्रत्येक पत्नीने आपल्या मतावर ठाम राहायला पाहिजे
अनेकदा समाजात अशी समजूत असते की पत्नीने आपल्या पतीच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले पाहिजे. पण हे खरंच खरं आहे का? तर असं काही नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मुद्द्यांबद्दलसांगणार आहोत, जिथे प्रत्येक पत्नीने आपल्या मतावर ठाम राहायला पाहिजे, आणि काही गोष्टी अशा ज्या तुम्हाला पटत नसतील, तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहचविणाऱ्या असतील तर आपल्या पतीचे ऐकण्यास नकार दिला पाहिजे. पत्नी असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची ओळख आणि स्वातंत्र्य धुळीत मिळवून टाका तसेच प्रत्येक गोष्टीत तुमच्या पतीशी सहमत असणं गरजेचं नाही. निरोगी आणि आनंदी वैवाहिक जीवनाचे स्वप्न खऱ्या अर्थाने तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा दोन्ही लोक एकमेकांना समजून घेतात, म्हणजेच नात्याचं कोणावरही ओझं राहत नाही. अशा 5 गोष्टी जाणून घेऊया, ज्या प्रत्येक पत्नीने स्वीकारण्यास नकार दिला पाहिजे, पती सहमत असो वा नसो.
आपल्या इच्छा आणि स्वप्नांचा त्याग करणे
प्रत्येक व्यक्तीची स्वतःची स्वप्ने आणि ध्येये असतात. लग्न म्हणजे त्या स्वप्नांना धुळीत मिसळवून टाकणे असा नाही, जर तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेईल, तर तो तुमची प्रत्येक इच्छा स्वतःची समजेल आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, परंतु जर पती तुमच्या इच्छेचा आदर करत नसेल आणि जर तुमची स्वप्ने सोडण्यासाठी कोणी तुमच्यावर दबाव आणत असेल, तर तुम्ही नकार द्यावा.
अपमान आणि शिवीगाळ
अपमान सहन करण्यासाठी किंवा शिवीगाळ ऐकण्यासाठी कोणीही लग्न करत नाही. जर तुमचा नवरा तुमचा अपमान करत असेल किंवा तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर तुम्ही आवाज उठवण्यापासून मागे हटू नका, मग समाज किंवा कुटुंब काहीही असो.
असुरक्षित वाटणे
जर तुम्हाला तुमच्या पतीसोबतही असुरक्षित वाटत असेल, तर कटू सत्य हे आहे की, तुम्हाला या लग्नाबद्दल पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की, हे त्रास आणि भांडणे कालांतराने कमी होतील किंवा तुम्ही त्यात सुधारणा कराल, तर विश्वास ठेवा याची काही खात्री नाही. अशा परिस्थितीत काय होते की, तुमच्या पतीचा स्वभाव तुमच्या मुलांचे बालपण बरबाद करतो आणि त्यांच्या निरागस मनावर कायमच्या खोलवर जखमा सोडतो. अशा परिस्थितीत याविरोधातही आवाज उठवायला हवा.
कुटुंबाचे नुकसान
जर तुमचा नवरा असा कोणताही निर्णय घेत असेल जो तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकेल, तर हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही त्याच्याशी सहमत होण्याऐवजी निषेधाचा आवाज उठवला पाहिजे आणि अशा गोष्टींना नकार दिला पाहिजे.
आर्थिक स्वातंत्र्याला धोका
प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा अधिकार आहे, परंतु जर तुमच्या पतीने ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही प्रतिकार करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की तुमची कमाई तुमची असो किंवा तुमच्या पतीची, त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही, म्हणजेच नोकरी किंवा पैसे खर्च करण्याच्या नावाखाली तुम्हाला दररोज अपमानित केले जाते किंवा प्रत्येक छोट्या गोष्टीचा हिशेब मागितला जातो असे झाल्यास, तुम्हाला ते नाकारणे आवश्यक आहे.
हेही वाचा>>>
Happy Relationship साठी 'या' 3 बाऊंड्रीज सेट करा, नातं होईल घट्ट, जोडीदाराचं वाढेल प्रेम
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )