Menstrual Hygiene Day 2022 : मासिक पाळी दरम्यान स्वच्छता महत्त्वाची! ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी..
Menstrual Hygiene Day 2022 : मासिक पाळीदरम्यान पुरेशी स्वच्छता न ठेवल्यामुळे महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची (यूटीआय) समस्या होऊ शकते.
Menstrual Hygiene Day 2022 : दरवर्षी 28 मे रोजी ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ (Menstrual Hygiene Day 2022) साजरा केला जातो. मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ हा दिवस महिला/मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.
दात घासणे, आंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे यासोबतच वैयक्तिक स्वच्छतेकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. मासिक पाळीदरम्यान पुरेशी स्वच्छता न ठेवल्यामुळे महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची (यूटीआय) समस्या होऊ शकते. म्हणूनच मासिक पाळीदरम्यान काही खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सॅनिटरी पॅड्स नियमित बदला
मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी, स्वतःला स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात दर चार ते सहा तासांनी सॅनिटरी पॅड बदलणे आवश्यक आहे. दिवसभर एकच पॅड वापरणे आरोग्यासाठी हानिकारक तर आहेच, त्याशिवाय यामुळे खाज आणि संसर्गही होऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या सुगंधी पॅडऐवजी सुती आणि कापडी पॅड देखील चांगला पर्याय आहेत.
टॅम्पॉन वापरताना काळजी घ्या!
मासिक पाळीत टॅम्पॉन वापरत असल्यास, स्वच्छतेसाठी दर तीन ते चार तासांनी ते बदला. वेळोवेळी टॅम्पॉन न बदलल्यास संसर्गाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे टॅम्पॉन वापरताना देखील वेळेची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला
मासिक पाळी दरम्यान स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला आणि दर काही तासांनी ती बदला. अस्वच्छ अंतर्वस्त्रांमुळे शरीरातून दुर्गंधी येत राहते आणि संसर्गाचा धोकाही वाढू शकतो. या दिवसांत सुती अंतर्वस्त्र घालण्याचा प्रयत्न करा, यामुळे त्वचा मऊ राहील आणि खाजेची समस्या उद्भवणार नाही.
वर्कआऊट करा
जर, तुम्ही तुमच्या मासिक पाळी दरम्यान निरोगी अन्न खात नसाल किंवा नियमित वर्कआउट रूटीन पाळत नसाल, तर यामुळे अधिक वेदना होऊ शकतात शकते आणि मूड स्विंग देखील होऊ शकतो. अशावेळी निरोगी दिनचर्या पाळा आणि जिमला जा. भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्वाच्या बातम्या :