Health News : गर्भधारणेचा विचार करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात?
Health News : एका निरोगी गर्भधारणेसाठी आणि बाळाच्या जन्मासाठी महिलांसोबत पुरुषांनीही तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. गर्भधारणेचा विचार करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात?
Health News : एका निरोगी गर्भधारणेसाठी (Pregnancy) आणि बाळाच्या जन्मासाठी महिलांसोबत पुरुषांनीही तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. जास्त वजन, बैठी जीवनशैली आणि व्यसनांचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे हार्मोनल असंतुलन, ओव्हुलेशन प्रक्रियेवर परिणाम होणे तसेच खराब अंडी आणि शुक्राणूंची (Sperm) गुणवत्ता खालावते. यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो.
अनेक अभ्यासांनुसार गेल्या काही वर्षांत शुक्राणूंची संख्या, गतिशीलता कमी आणि रचनेमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले आहे. गुणवत्तेत होणारी ही घट चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, ताण, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर, तंबाखू, मद्यपान यांसारख्या जीवनशैलीशी निगडित बदलांशी जोडले गेले आहे. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे याला ऑलिगोस्पर्मिया असे म्हणतात. तर शुक्राणू अजिबात तयार होत नाहीत, तेव्हा त्याला अॅझोस्पर्मिया म्हणतात. त्यामुळे जीवनशैलीत योग्य बदल करणे, संतुलित आहाराबरोबरच व्यायामाची जोड आवश्यक आहे.
एग फ्रीजिंगचा पर्याय
हल्ली शिक्षण, करिअर, नोकरीमुळे उशिराने लग्न होते आणि त्यामुळे गर्भधारणेचे वय देखील वाढत आहे. पण भविष्यात त्यांना बाळाची आस असेल तर एग फ्रीझिंगच्या (Egg Freezing) पर्यायामुळे त्यांना आई बनण्याची संधी मिळू शकते. भविष्यातील प्रजनन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि निरोगी गर्भधारणा करण्याचा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे. ऑटोइम्युनिटी डिसऑर्डर या विकाराने पिडित महिला गर्भधारणेची योजना पुढे ढकलत असेल तर अशा महिला आपले स्त्री-बीज फ्रीझिंग करुन ठेवू शकतात. कारण ऑटोइम्युनिटीमुळे महिलेच्या अंडाशयावर परिणाम होऊ शकतो. यामुळे अंडाशयातील अंडी तयार होण्याची संख्या घटू शकते. याशिवाय महिलेला कर्करोग किंवा हायपरथायरॉईडिझम यांसारखे आजार उद्भवू शकतात. मुळात, उपचार सुरु असताना एखादी महिला गर्भवती राहिल्यास तिच्या गर्भातील बाळावर या औषधांचा परिणाम होऊ शकतो. या महिला अनेक वर्षांपासून उपचार घेत असल्याने गर्भधारणा करु शकत नाहीत. त्यामुळे असा त्रास असलेल्या महिलांनी उपचार सुरु करण्यापूर्वी एग फ्रीझिंगचा पर्याय निवडणे योग्य राहिल.
प्री प्रेग्नन्सी टेस्ट करणे गरजेचे
अनेक महिलांना गर्भधारणा होत नाही म्हणून नैराशात जातात. गर्भधारणेपूर्वी काही चाचण्या किंवा प्री प्रेग्नन्सी टेस्ट करणे गरजेचे आहे. यामुळे जर तुम्हाला काही शारीरिक व्याधी म्हणजेच मधुमेह, अस्थमा, थायरॉईड यासारख्या आजारांवर योग्य तो उपचार करता येतो. म्हणूनच या चाचण्या आवश्यक आहेत. उशिराने लग्न करणाऱ्या जोडप्यांचे लग्नाआधी समुपदेशन केले जाते. जोडप्यांची रक्त तपासणी करुन काही समस्या असल्यास त्यावर उपचारही वेळेत सुरु केले जाऊ शकतात. तसेच गरदोर होण्यापूर्वी तीन महिने आधीच फॉलिक अॅसिडच्या डोसची सुरुवात केली जाते. या दरम्यान रक्तदाब आढळल्यासही त्यानुसार औषधे सुरु केली जात असून बाळाची वाढ खुंटणार नाही याची दक्षता घेतली जाते. गर्भधारणेचा विचार करताना प्रत्येक जोडप्याने तज्ज्ञांची भेट घेऊन शंकाचे निरसन करावे.
- डॉ. माधुरी रॉय, स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, कन्सिव्ह आयव्हीएफ, पुणे
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )