जिममध्ये महिलेने उचलले जास्तीचे वजन, मग काय झाले हे जिममध्ये जाणाऱ्यांनी एकदा पाहाच
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिमला आवर्जून जातात
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिमला आवर्जून जातात. काही वेळा शो ऑफसाठी जड वजनही उचलतात. जड वजन उचलण्याच्या नादात कधीकधी त्यांना स्व:तचे भान राहत नाही. जिममध्ये जास्त वजन उचलून व्यायाम करणे किती धोकादायक आणि प्राणघातक असू शकते हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओवरून समजू शकतो. जिममध्ये जाणाऱ्यां प्रत्येकाने एकदा पाहाच
जिममध्ये महिलेने उचलले जास्तीचे वजन, मग काय झाले?
सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या मुलीसोबत जिममध्ये पोहोचते. दोघे एकत्र जिममध्ये पोहोचतात आणि एकमेकांशी बोलू लागतात. थोडा वेळ एकमेकांशी बोलून झाल्यावर महिला व्यायामाला जाते. तेव्हा ती समोर ठेवलेला जड लोखंडाचा रॉड उचलण्याचा प्रयत्न करते. महिला रॉड उचलते पण त्याचे वजन तिला झेपत नाही. त्यावेळी वजनदार रॉड महिलेच्या अंगावर पडतो आणि तिचा तिथेच मृत्यू होतो आहे.
EL ACCIDENTE en el QUE MURIÓ UNA MUJER en el GIMNASIO
— Carlos Jiménez (@c4jimenez) February 23, 2022
Así sacó esta mujer la barra cargada con 160 kg.
En total eran 180… y no los aguantó.
Tuvieron q cargarlos entre dos para quitársela de encima.
Ahí murió.@FiscaliaCDMX inicio una investigación. pic.twitter.com/8Qj4uHqLPw
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मेक्सिकोचा आहे. ही महिला व्यायामासाठी जड प्लेट्सने लावलेला रॉड निवडते. तसेच कोणत्याही आधाराशिवाय ती रॉड उचलू लागते. रॉडचे वजन स्त्रीच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. पण तरीही ती स्त्री प्रयत्न करते आणि रॉड उचलून घेते. जास्त वजन असल्यामुळे तिला तो लोखंडी रॉड फार काळ सांभाळता येत नाही. महिलेच्या हातातून रॉड निसटून तिच्या अंगावर पडतो. आणि तिच्या डोक्याला लागते. त्यानंतर काही लोक येऊन रॉड उचलतात. रॉड उचलताच महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर येते. ही संपूर्ण घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.