एक्स्प्लोर

Winter Travel: नोव्हेंबर-डिसेंबर कुटुंबासोबत देशाचं सौंदर्य, गोड क्षण अनुभवा, भारतीय रेल्वेचे खास टूर पॅकेज एकदा पाहाच...

Winter Travel: बरेचदा लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पॅकेजने प्रवास करणे पसंत करतात. यासाठी IRCTC कडून नोव्हेंबर-डिसेंबर हिवाळी टूर पॅकेज जारी करण्यात आले आहेत.

Winter Travel: आता काही दिवसांवरच दिवाळी सण साजरा होणार आहे, या निमित्त काही शाळांनी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्याही दिल्या असतील, अशात पालकांनी जर आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढला तर ते कुटुंबाला वेळ देऊ शकतील, आणि या सुट्टीनिमित्त फिरायचा प्लॅनही केला जाईल, अनेक जण लॉंग पिकनिकसाठी टूर पॅकेजचा पर्याय स्वीकारतात. या टूर पॅकेजसह सहलीचे नियोजन करताना प्रवाशांकडे अनेक पर्याय असतात. ते त्यांच्या सोयीनुसार लांब आणि लहान टूर पॅकेजेस निवडू शकतात.

भारतीय रेल्वे टूर पॅकेजमधून प्रवास करण्याचा विचार करताय?

बरेचदा लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पॅकेजने प्रवास करणे पसंत करतात. कारण यामध्ये त्यांना रोजच्या प्रवासासाठी वेगळे नियोजन करावे लागत नाही. प्रवासाची संपूर्ण तयारी टूर ऑपरेटरकडून केली जाते. यासोबतच प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या योजनांचीही माहिती मिळू शकते. कारण प्रवासादरम्यान तुम्हाला कुठे नेले जाईल याची संपूर्ण माहिती दिलेली असते. जर तुम्ही भारतीय रेल्वे टूर पॅकेजमधून प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरसाठी टूर पॅकेज बुक करू शकता.

नोव्हेंबरपासून सुरू होणारे टूर पॅकेजेस 

गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेजेस – 7 नोव्हेंबरपासून तिकिटे बुक करता येतील.
लखनौ आणि अयोध्या टूर पॅकेज- 8 नोव्हेंबरपासून तिकीट बुक करता येईल.
अयोध्या, पोखरा, मुक्तिनाथ आणि काठमांडू टूर पॅकेज - 11 नोव्हेंबरपासून प्रवास सुरू होईल.
नैनिताल, अल्मोडा, मुक्तेश्वर आणि दिल्ली टूर पॅकेज- हा प्रवास 12 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
दार्जिलिंग, गंगटोक आणि कालिम्पाँग टूर पॅकेज - तिकीट 16 नोव्हेंबरपासून बुक करता येईल.
आग्रा, दिल्ली आणि जयपूर टूर पॅकेज- 20 नोव्हेंबरपासून टूर सुरू होईल.
गंगटोक, दार्जिलिंग आणि न्यू जलपाईगुडी टूर पॅकेज - 30 नोव्हेंबरपासून टूर सुरू होईल.

डिसेंबरपासून सुरू होणारे टूर पॅकेजेस 

गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी, मावलिनाँग आणि काझीरंगा टूर पॅकेजेस - टूर 3 डिसेंबरपासून सुरू होईल.
भुज, कच्छ, जामनगर आणि राजकोट टूर पॅकेज - 21 डिसेंबरपासून तिकिटे बुक करता येतील.
पुष्कर, रणथंबोर, कुंभलगड, जयपूर आणि उदयपूर टूर पॅकेजेस - तुम्ही 24 डिसेंबरपासून तिकिटे बुक करू शकता.
तिरुपती, मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी आणि पुडुचेरी टूर पॅकेजेस - तुम्ही 23 डिसेंबरपासून तिकीट बुक करू शकता.
वडोदरा, भावनगर, सोमनाथ, द्वारका आणि राजकोट टूर पॅकेजेस - तुम्ही 6 डिसेंबरपासून तिकिटे बुक करू शकता.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.

टूर पॅकेजमध्ये या सुविधा उपलब्ध

  • या टूर पॅकेजच्या फीमध्ये तुम्हाला जेवणाची सुविधा मिळते.
  • अनेक पॅकेजेसमध्ये तुम्हाला नाश्ता किंवा दुपारच्या जेवणासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील.
  • पॅकेजमध्ये प्रवास करण्यासाठी बस आणि कॅबची सुविधाही उपलब्ध आहे.
  • त्यामुळे शहरात फिरण्यासाठी वेगळे वाहन बुक करावे लागणार नाही.
  • अनेक पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करण्याचीही संधी दिली जाते.
  • तुमचे राउंड ट्रिप तिकीट टूर ऑपरेटरद्वारे पॅकेज फीमध्ये समाविष्ट केले जाते.
  • हॉटेल सुविधांचाही पॅकेज फीमध्ये समावेश आहे.
  • IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करा.

हेही वाचा>>>

Travel: दिवाळीसाठी रेल्वेचं Advance तिकीट बुक करताय? 120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार नाही, बुकिंग प्रणालीतील बदल जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : देवेंद्र फडणवीस ते विधानसभा निवडणूक; मनोज जरांगेंची प्रतिक्रियाRaigad  District Vidhan Sabha Constituency 2024 : भरतशेठ गोगावलेंची मंत्रिपदाची इच्छापुर्ती होणार?Deepak Kesarkar : अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य, केसरकरांनी बातमी फोडली?Job Majha : युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
Embed widget