एक्स्प्लोर

Winter Travel: स्वित्झर्लंड विसराल! फॉरेनपेक्षा कमी नाहीत भारतातील 'ही' ठिकाणं, फार लोकांना माहीत नाही, हिवाळ्यात फिरण्यासाठी एकदम बेस्ट! 

Winter Travel: थंडीचा ऋतू सगळ्यांनाच आवडतो. अशावेळी, भारतातील मिनी स्वित्झर्लंड म्हटल्या जाणाऱ्या 'या' ठिकाणांना भेट देणे खूप खास ठरेल. या सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

Winter Travel: हिवाळा असा ऋतू आहे, जो सर्वांनाच आवडतो. हिवाळ्याच्या ऋतूत, प्रत्येकाला असे वाटते की अशा ठिकाणी जावं, जिथे आपलं सगळं टेन्शन बाजूला ठेवून काही क्षण का होईना निसर्गाशी एकरुप व्हावं. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला क्षणभर विसावा म्हणजेच कामाच्या गडबडीतून ब्रेक घेऊन निसर्गाशी एकरुप होणे गरजेचे आहे. कारण यामुळे व्यक्तीचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य अगदी उत्तम राहते. आज आपण भारतातील खास हिवाळ्यात फिरता येतील, अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. जे फॉरेनच्या देशांपेक्षा कमी नाही. या ठिकाणांना मिनी स्वित्झर्लंड देखील म्हटले जाते. जाणून घेऊया.. 

भारतातील मिनी स्वित्झर्लंड..!

स्वित्झर्लंड हे एक असे ठिकाण आहे. जिथे प्रत्येकाला जावेसे वाटते. खास करून सामान्य भारतीय नागरिकासाठी या ठिकाणी पोहचणे थोडे कठीण असू शकते. कारण एका देशातून दुसऱ्या देशात जाणे म्हणजे भरपूर खर्च करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला भारतातीलच अशा काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत. ज्यांना भारतातील मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. जिथे बर्फवृष्टी होते, जिथे थंड वारे आणि शांत दऱ्या आपल्याला स्वतःकडे आकर्षित करतील, भारतात अशी काही ठिकाणं आहेत. जिथे भेट देणे खूप खास ठरेल. तुम्हाला माहिती आहे का? हिवाळ्याच्या ऋतूत भारतातील काही ठिकाणांना मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. बर्फाच्छादित पर्वत, हिरव्यागार दऱ्या आणि विलोभनीय दृश्ये मन मोहून टाकतात. आज आम्ही तुम्हाला स्वित्झर्लंडसारख्या काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकता...

हे भारतातील मिनी स्वित्झर्लंड...

खज्जियार-  नैसर्गिक सौंदर्य, सुरूची झाडं, बर्फ..

हिमाचल प्रदेशातील खज्जियारला तेथील नैसर्गिक सौंदर्य, सुंदर सुरूची वृक्ष आणि बर्फाच्छादित खडकांमुळे भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. जर तुम्ही या ठिकाणाजवळ राहत असाल तर खज्जियार तलावाच्या काठावर वेळ घालवण्याचा आनंद घ्या. याशिवाय तुम्ही पॅराग्लायडिंग, झोरबिंग आणि ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.

औली - भारताचे स्कीइंग डेस्टिनेशन

उत्तराखंडमधील औलीला भारताचे स्कीइंग डेस्टिनेशन म्हटले जाते. इथले बर्फाच्छादित पर्वत आणि निळे आकाश तुम्हाला स्वित्झर्लंडसारखे वाटते. येथे तुम्ही स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा आनंद घेऊ शकता. औलीचे जोशीमठ आणि गोरसन बुग्याल ट्रेक खूप प्रसिद्ध आहेत. याशिवाय तुम्ही येथे केबल कार राइडचाही अनुभव घेऊ शकता.

गुलमर्ग - भारताचे स्वित्झर्लंड

सुंदर बर्फाच्छादित तलाव, गोंडोला राइड्स आणि जागतिक दर्जाच्या स्कीइंग सुविधांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गला भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाते. येथे तुम्ही गुलमर्ग गोंडोला राइडचा आनंद घेऊ शकता. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

How To Wash Rice Correctly : तांदूळ धुण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' चुका केल्यास भात होईल चिकट आणि चवहीन
तांदूळ धुण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' चुका केल्यास भात होईल चिकट आणि चवहीन
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Roti Dough In Fridge : कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवताय? 'इतक्या' तासानंतर वापरणे ठरू शकते धोकादायक
कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवताय? 'इतक्या' तासानंतर वापरणे ठरू शकते धोकादायक
धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली
धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget