Winter Health Tips : थंडीत अंघोळीनंतर त्वचा कोरडी होऊ लागली तर, 'ही' आहेत यामागची मुख्य कारणं
Winter Health Tips : थंड वाऱ्यामुळे त्वचेतील पाणी कोरडे होऊ लागल्यानेही त्वचा कोरडी होते.
Winter Health Tips : हिवाळ्यात (Winter Season) तापमानातील गारव्यामुळे आपल्याला त्वचेशी संबंघित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिवाळ्यात आपली त्वचा नैसर्गिकरित्याच मुळात कोरडी असते हे तुमच्याही लक्षात आलं असेल. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील पाणी कोरडे होऊ लागल्यानेही असे होते. यामुळेच आंघोळीनंतर त्वचा कोरडी (Dry Skin) होते, खाज सुटते आणि चिडचिड होते. तसेच, काही लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी त्वचेची योग्य काळजी न घेणे, नीय मॉइश्चराईझ न करणे हे यामागील मुख्य कारण असू शकतं. तसेच, आणखी कोणत्या कारणांमुले त्वचा कोरडी होते हे जाणून घेऊयात.
खूप गरम पाण्याने अंघोळ करणे
काही लोक थंडीमुळे खूप गरम पाण्याने अंघोळ करतात. थंडीत गरम पाण्याने अंघोळ करायला मजा येत असली तरी यामुळे तुमच्या त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतून नैसर्गिक तेल बाहेर पडू लागते. अशा परिस्थितीत त्वचेला मॉइश्चरायझेशन करण्याची गरज असते. त्यामुळे त्वचेवर जळजळ, लालसरपणा, कोरडेपणा यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.
चुकीच्या साबणाचा वापर करणे
अनेकांना हे माहित नसेल पण थंडीत जर तुम्ही साधा किंवा चुकीच्या साबणाचा वापर केला तर तुमची त्वचा कोरडी होते. साबणामध्ये खूप केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम होऊन त्वचा कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला जास्तीत जास्त मॉइश्चरायझ करू शकेल असा साबण वापरावा. स्वस्त साबण वापरणं टाळा.
योग्य मॉइश्चरायझर न लावणे
जे लोक अंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावत नाहीत अनेकदा अंघोळीनंतर त्यांच्या त्वचेवर खाज सुटू लागते. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. ही समस्या टाळण्यासाठी, अंघोळीनंतर आपल्याला सर्वात आधी पहिली गोष्ट म्हणजे चांगलं मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे. अंघोळ केल्यावर पहिली गोष्ट म्हणजे मॉइस्चराइज लावा.
शरीर डिहायड्रेट
थंडीत भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण थंड हवेमुळे शरीर लगेचच डिहायड्रेट होते. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. यासाठी दिवसातून किमान तीन लीटर पाणी पिणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Tips : गरोदरपणात हाय हिल्स घालाव्यात की घालू नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?