Pregnancy Tips : गरोदरपणात हाय हिल्स घालाव्यात की घालू नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?
Pregnancy Tips : गरोदरपणात टाच घातल्याने पाय दुखू शकतात. काही प्रकरणांमध्ये, गुडघेदुखी होऊ शकते.
Pregnancy Tips : प्रत्येक मुलीला हील्स घालायला आवडतात. यामुळे उंचीही दिसते आणि हिल्स दिसायलाही छान दिसतात. पण, या सर्व फॅशन फॉलो करण्यासाठी एक ठराविक वेळ आणि वय असतं. काही स्त्रिया गरोदरपणात (Pregnancy Tips) उंच हिल्स घालतात. पण, गरोदरपणात हिल्स घाल्याव्यात की घालू नये? असा प्रश्न अनेकांना पडतो. गरोदरपणात अनेक चढ-उतार येत असल्याने, उंच हिल्स घालणे कितपत सुरक्षित आहे? याच संदर्भात तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
गरोदरपणात हिल्स घालाव्यात की घालू नये?
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक स्त्रीने गरोदरपणाच्या सुरुवातीपासून बाळाला दूध पाजण्यापर्यंत ते बाळासा सांभाळण्यापर्यंत हिल्स घालू नये. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. पण, गर्भधारणेदरम्यान स्त्रियांचं वजन फार वाढतं. या काळात हिल्स घातल्याने शरीराचं संतुलन बिघडू शकतं. आणि अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अनेक महिलांमध्ये, गर्भधारणेदरम्यान पायांना सूज येते. अशा वेळी, हिल्समुळे पायांना क्रॅम्प्स येणे तसेच पायांना सूज येणे यांसारखे प्रकार वाढू शकतात. तसेच, जास्त वेळ हिल्स घातल्याने पाठदुखीचा त्रासही होऊ शकतो.
हे देखील गर्भधारणेदरम्यान हिल्स घालण्याचे तोटे आहेत
गरोदरपणात हिल्स घातल्याने पाय दुखू शकतात. काही प्रकरणांमध्ये, गुडघेदुखी होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात हिल्स अतिशय काळजीपूर्वक घातली पाहिजे. तसेच, बाळ लहान असताना, हिल्ससह बाळाला मांडीवर घेऊन बसण्यात अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून, बाळ चालायला लागेपर्यंत, आईने हिल्स घालणे टाळावे.
गरोदरपणात कोणत्या प्रकारचे पादत्राणे घालावेत?
डॉक्टरांच्या मते, गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत महिलांनी सावधपणे चालायला हवे. कारण या काळात थोडासा जरी धक्का लागल्याने किंवा पाय घसरल्याने गर्भपात होण्याचा धोका असतो. तसेच, पहिल्या तिमाहीत हिल्स घालण्यास मनाई नाही. ऑफिसला जाणार्या स्त्रिया हलक्या टाचांच्या हिल्स घालू शकतात. पण, त्या पूर्ण सावधानतेने वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचा पाय घसरणार नाही. गरोदरपणाच्या दुस-या आणि तिसर्या तिमाहीत जास्त वजन वाढल्यामुळे हिल्स घालणे ही समस्या असू शकते, म्हणून या काळात हिल्सच्या ऐवजी आरामदायक फ्लॅट चप्पल, सँडल किंवा शूज घालणे जास्त चांगले मानले जाते. कारण तिसर्या तिमाहीत स्लिप आणि फॉल झाल्यास प्री-मॅच्युअर डिलिव्हरी होण्याचा धोका असतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Fitness Tips : सूर्यनमस्काराशी संबंधित 'या' चुका पडू शकतात महागात; वाचा व्यायामाची योग्य पद्धत