Winter Hair Care Tips : हिवाळ्यात वारंवार केसगळतीचा त्रास होतोय? 'या' सवयी टाळा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Winter Hair Care Tips : हिवाळ्यात उन्हात बसणे सर्वांनाच आवडते, पण ओले केस उन्हात वाळवणे केसांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
Winter Hair Care Tips : केसांनी नेहमीच बाईचं सौंदर्य अधिक खुलतं. केस (Hair) लांब असोत किंवा लहान त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यात केस धुणे आणि कोरडे करणे थोडे कठीण असते. पण बहुतांश महिला केस सुकवण्यासाठी उन्हात बसतात. उन्हात बसून केस कोरडे केल्याने केस कमकुवत होतात. यासाठी ओले केस नैसर्गिकरित्या कोरडे होऊ देण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की केस धुतल्यानंतर ओले केस विंचरू नयेत. यामुळे केस गळण्याची, तुटण्याची शक्यता जास्त असते.
ओले केस उन्हात वाळवणे हानिकारक ठरू शकते
अनेकांना केस धुतल्यानंतर त्यावर लगेच हेअर ड्रायर फिरविण्याची सवय असते. घाईगडबडीत केस पटापट वाळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, सर्वात आधी केस हलके कोरडे होऊ द्या आणि मगच ड्रायर वापरा. केसांवर ड्रायर वापरताना, ड्रायरची सेटिंग नेहमी मध्यम ठेवा. तसेच, अनेक महिलांना ओले केस तसेच बांधण्याची सवय असते. हे देखील अनेक महिलांच्या केसगळतीचे मुख्य कारण असू शकते. कारण मुळातच केस धुतल्यानंतर ओले केस असतात ते फार स्ट्रॉंग नसतात. ते नाजूक असतात. जसजसे, केस कोरडे होतात त्याप्रमाणे केसांची घनता वाढते.
केस तुटण्याचे हेही कारण असू शकते
ओल्या केसांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे, ओल्या केसांवर कधीही कंगवा फिरवू नये. बऱ्याच लोकांना असे वाटते की, केसांतील गुंता सोडविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ओले केस कोम केल्याने केस सुरळीत राहतात. पण लक्षात घ्या की तुमच्या या सवयीमुळे तुमचे केस तुटू शकतात. जर तुम्हालाही तुमचे केस जास्त काळ घनदाड ठेवायचे असतील तर तुमच्या ओल्या केसांवर कधीच कंगवा फिरवू नका.
अपुऱ्या पोषणाचा अभाव (Nutritional Deficiency) :
हार्मोनल असंतुलनाच्या व्यतिरिक्त सध्याच्या काळात डायटिंग (Dieting) देखील खूप सामान्य गोष्ट झाली आहे. यामध्ये अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. या डाएटमधून केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. तसेच, केसांवर Hair Styling चा प्रभाव हेदेखील केसगळती होण्याचे महत्वाचे कारण आहे. Hair Styling साठी वारंवार केसांवर वापरण्यात येणारे केमिकल (Chemical), आयनिंग (Ironing), हेअर कलर (Hair Colour) यामुळे मोठ्या प्रमाणात केसगळती होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :