(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Air Conditioner Capacity : ...यासाठी AC ची क्षमता टनमध्ये मोजतात; कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Air Conditioner Capacity : तुम्हीही एसी वापरत असाल तर एक गोष्ट लक्षात आली असेल की, एसीची कूलिंग क्षमता किलोवॅट किंवा इतर कोणत्याही प्रमाणात लिहिलेली नाही तर टनमध्ये लिहिली आहे.
Air Conditioner Capacity : एअर कंडिशनर उन्हाळ्याच्या महिन्यांत तुमचे घर किंवा ऑफिस थंड ठेवण्याचे काम करते. एअर कंडिशनरलाच एसी म्हणतात. तुमच्या घरात असलेला AC आणि रेफ्रिजरेटर दोन्ही एकाच फॉरमॅटवर काम करतात. फरक एवढाच आहे की रेफ्रिजरेटर लहान जागा थंड करतो आणि एसी घर किंवा ऑफिसमध्ये आरामदायी तापमान तयार करतो. एसीमध्ये सेंट्रल हीटिंग आणि कूलिंग सिस्टीम दिली जाते, जी मेटल शीट डक्टवर्कद्वारे थंड हवा पाठवते. या प्रक्रियेत, उबदार हवा आत घेतली जाते आणि त्याचं थंड हवेत रूपांतर केलं जातं.
एअर कंडिशनरची क्षमता
तुम्हीही एसी वापरत असाल तर तुम्ही एसीच्या सूचना कधी वाचल्या आहेत का? एसीची कूलिंग क्षमता किलोवॅट किंवा इतर कोणत्याही प्रमाणात लिहिलेली नाही तर टनमध्ये लिहिलेली आहे. प्रत्यक्षात AC चा टन किंवा वजनाशी काहीही संबंध नाही. आता ते फक्त टनांमध्येच का मोजले जाते. मात्र, एसी टनमध्ये का मोजले जाते हे समजून घ्या.
एसीची क्षमता टनमध्ये का मोजली जाते?
हा एसी 1 तासात खोलीतून किती उष्णता काढून टाकू शकतो हे सांगण्यासाठी एसीमध्ये टनमध्ये वापरले जाते. खरंतर, जुन्या काळात खोली थंड करण्यासाठी नैसर्गिक बर्फाचा वापर केला जात असे. त्यावेळी 1 टन बर्फाने खोली 24 तास थंड केली जात होती. फक्त या निकषाच्या आधारावर, एसी युनिट्सचे मोजमाप टनमध्ये केले जाते.
एसीच्या क्षमतेचं मोजमाप कसं करावं?
तुम्ही एका एसीच्या क्षमतेचं मोजमाप कसं कराल? तुम्ही 1 टन एसी (1 Ton AC) किंवा 1.5 टन (1.5 Ton AC) मॉडेल खरेदी करु शकता. लहान खोल्यांसाठी 1 टन एसी योग्य ठरतो. पण तुमची लिव्हिंग रुम, छोटे ऑफिस आणि इतर मोठ्या भागात 1.5 टन एसीची आवश्यकता असू शकते.
1 टन एसी 1 टन बर्फासमान
जेव्हा AC बनवला गेला तेव्हा असे आढळून आले की बर्फाची थंड करण्याची क्षमता आणि AC ची थंड करण्याची क्षमता दोन्ही सारखीच आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर 1 टन बर्फाने जी शीतलता निर्माण होते ती 1 टन AC द्वारेही निर्माण होते. या प्रकरणात, एका खोलीत 1 टन बर्फ आणि दुसर्या खोलीत 1 टन एसी ठेवल्यास, दोन्हीचा थंडपणा सारखाच असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
Intermittent Fasting करताना तुम्हीसुद्धा 'या' चुका करता का? वजन कमी न होण्यामागचं 'हे' कारण असू शकतं