Emoji : जगभरात वापरल्या जाणाऱ्या इमोजीचा शोध नेमका कोणी लावला? वाचा इमोजीचा रंजक इतिहास
Emoji : सन 1998 पासून ते 1999 च्या सुरुवातीस रंगीबेरंगी इमोजींचा वापर सुरू झाला. खरंतर शिगेताका कुरिता यांनी एका टेलिकॉम कंपनीसाठी हा इमोजी बनवला होता.
Emoji : सध्याच्या काळात सोशल मीडियावर चॅटिंग करणं असो किंवा व्हॉट्सअॅपवर. प्र्त्येकजण इमोजीचा वापर करतात. अनेक लोक तर दोन ओळींचा मेसेज लिहिण्यापेक्षा थेट इमोजीच पाठवून आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. पण, रोजच्या वापरात वापरले जाणारे हे इमोजी यांचा शोधन नेमका कोणी लावला? याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला या संदर्भात सर्व माहिती सांगणार आहोत.
या जपानी व्यक्तीने लावला इमोजीचा शोध
शिगेताका कुरिता यांनी इमोजीचा शोध लावला असे मानले जाते. कुरिता यांनी वयाच्या 25 व्या वर्षी त्यांचा पहिला इमोजी सेट तयार केला. 1999 मध्ये, NTT DOCOMO या जपानी सेल फोन कंपनीने मोबाईल फोन आणि पेजरसाठी 176 इमोजींचा संच जारी केला.
इमोजी कसे बनवले?
सन 1998 पासून ते 1999 च्या सुरुवातीस रंगीबेरंगी इमोजींचा वापर सुरू झाला. खरंतर शिगेताका कुरिता यांनी एका टेलिकॉम कंपनीसाठी हा इमोजी बनवला होता. लोकांना त्यांचा संदेश कमी शब्दात चांगल्या प्रकारे पोहोचवता यावा यासाठी हे इमोजी तयार करण्यात आले आहे. पूर्वी ईमेल पाठवण्यासाठी अक्षरांची संख्या फक्त 250 होती. लोकांना त्यांच्या भावना इतक्या कमी शब्दांत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. ही अडचण दूर करण्यासाठी कुरिता यांनी पहिल्यांदा इमोजी बनवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी कॉमिक बुक्स, लाईटबल्ब, टिकलिंग बॉम्ब आणि हवामान यातून कल्पना घेतल्या आणि नंतर या चित्रांमध्ये स्माईली, राग, आश्चर्य आणि गोंधळ अशा भावना दर्शविणारे इमोजी तयार केले.
जगभरात इमोजी कसे प्रसिद्ध झाले?
सर्वात आधी, 2007 मध्ये, Apple ने आपल्या iPhone मध्ये इमोजी कीबोर्ड सादर केला. याचा वापर करून, आयफोन यूजर्स त्यांच्या समोरच्या व्यक्तीच्या सामग्रीसह त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. हळुहळू ते जगभर लोकप्रिय होत गेले. त्याची लोकप्रियता इतकी वाढली की 2013 साली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये इमोजी या शब्दाचा समावेश करण्यात आला. यानंतर, 2015 मध्ये, इमोजीला वर्षातील सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आले आणि त्यानंतर 2016 मध्ये, न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टने त्यांच्या कायमस्वरूपी संग्रहात शिगाताका कुरिताच्या 176 इमोजींचा पहिला संच समाविष्ट केला जो त्यांनी प्रथम तयार केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
Biscuit : बिस्किटात अनेक छिद्र का असतात? ही कोणती डिझाईन नाही तर यामागे आहे वैज्ञानिक कारण