एक्स्प्लोर
Advertisement
परीक्षेच्या काळात आहारात 'हे' बदल करा!
नवी दिल्लीः परीक्षेच्या काळात आहाराची खास काळजी घेणं गरजेचं असतं. या काळात अभ्यास जास्त करावा लागतो आणि एकाग्रताही जपावी लागते. मात्र आहाराचा ताळमेळ चुकल्यास अभ्यासात अनेकदा मन लागत नाही.
परीक्षेच्या काळात आहारामध्ये जीवनसत्वयुक्त, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व असणारे पदार्थ घेतल्यास शारीरिक प्रकृतीसोबतच अभ्यासात एकाग्रता आणण्यास मदत होते, असं आहार तज्ञांचं मत आहे.
कशी घ्याल काळजी?
- जास्त जागण्यासाठी वारंवार कॉफी आणि चहा पिण्याऐवजी ग्रीन टी घ्यावा. ग्रीन टीमधील अँटी ऑक्सीडेंटमुळे मन प्रसन्न ठेवण्यास मदत होते.
- डाएट करत असल्यास केळी खावी. केळीमधील मॅग्नेशीअममुळे थकवा येत नाही.
- शरीरातील पाण्याच्या प्रमाणात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी शक्य झाल्यास नारळ पाणी किंवा साधं पाणी प्यावं.
- कॅल्शिअम, प्रोटीन आणि जीवनसत्व मिळवण्यासाठी अंडी फायदेशीर आहेत.
- आहारात टोमॅटोचा समावेश केल्यास फायदा होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement