Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? दररोज फॉलो करा 'या' टिप्स
Weight Loss Tips : तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज या टिप्स नक्की फॉलो करा.
Weight Loss Tips : अनेकांचे असे मतं असते की डाएटिंग केल्याने वजन कमी होते. डाएटिंग करत असताना अनेक कमी प्रमाणात खातात. काही लोक जिममध्ये जाऊन वजन कमी वर्क आऊट करतात. त्याने देखील वजन कमी होते. पण तुम्हाला घरच्या घरी वजन कमी करायचे असेल तर रोज या टिप्स फॉलो करा.
1. गरम पाणी प्या- वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल. गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की सकाळी 2 कप कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उर्जा निर्माण होते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने वजन झटपट कमी होते.
2. व्यायाम करा- चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी वर्क आऊट करा. सकाळी व्यायाम केल्याने शरीरातील फॅट्स कमी होतात. त्यामुळे वजन कमी होते. तसेच सकाळी व्यायाम केल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होते. दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते आणि आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते.
3. हेल्दी ब्रेकफास्ट खा- रोज साकळी ब्रेकफास्टमध्ये अंडे, दूध, ड्रायफ्रूट्स, स्प्राउट्स, ब्राउन ब्रेड, शेक, स्मूदीज इत्यादींचा समावेश करावा. तसेच ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन आणि फाइबर यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.
4. शरीराला हायड्रेट ठेवा- शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवायची असेल तर तुम्ही रोज भरपूर पाणी प्यायले पाहिजे. जेव्हा आपण पाणी पितो. तेव्हा आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. तसेच शरीर हायड्रेट राहते. आपल्या शरीरात 70% पाणी असते. त्यामुळे पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Skin Care In Winter: हिवाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी; ट्राय करा या सोप्या टिप्स
Omicron Coronaviras : ओमायक्रॉनचा धोका वाढतोय; जाणून घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )