Weight Loss: चक्क एका दिवसात 1 ते 2 किलो वजन कमी होणार? स्वामी रामदेव यांनी सांगितला रामबाण फॉर्म्युला! ना व्यायाम..ना डाएट प्लॅन?
Weight Loss: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि व्यायामाचा कंटाळा आला असेल, तर योगगुरू स्वामी रामदेव यांनी दिलेला हा फॉर्म्युला ट्राय करून पाहा.
Weight Loss: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत कामाचा ताण, जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. सध्याच्या युगात निरोगी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी सगळ्यांना वजनही झपाट्याने कमी करायचंय. तसं पाहायला गेलं तर वजन कमी करणे कठीण काम आहे. यासाठी लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात, डाएट करतात आणि उपवास करतात, पण कधी-कधी या सगळ्या गोष्टी आरोग्याला हानी देखील पोहोचवू शकतात. आयुर्वेदातही काही पद्धती आहेत, ज्याचा अवलंब करून वजन कमी करता येते. पतंजलीचे संस्थापक योगगुरू स्वामी रामदेव यांनी दावा केला आहे की, त्यांनी सुचवलेल्या या घरगुती उपायाचा अवलंब केल्यास एका दिवसात 1 ते 2 किलो वजन कमी करता येते. या उपायाबद्दल जाणून घेऊया.
वजन कमी करण्याचा रामबाण फॉर्म्युला?
स्वामी रामदेव महाराजांनी वजन कमी करण्याचा हा फॉर्म्युला सांगितला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या फॉर्म्युलाबद्दल जाणून घ्या..
1 दिवसात तुमचे 2 किलो वजन कसे कमी होईल?
स्वामी रामदेव महाराजांनी सांगितले, वजन कमी करण्यासाठी अश्वगंधाच्या पानांचे सेवन करावे. योगगुरू बाबा रामदेव सांगतात की, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी अश्वगंधाच्या 4 ते 5 पानांचे सेवन करावे लागेल. त्याचे सेवन करण्याचे काही मार्ग खालीलप्रमाणे आहेत, जसे की या पानांचा रस काढणे किंवा त्याची पाने पाण्यात उकळणे आणि काढा पिणे. तुम्हाला हवे असल्यास ही पाने चावून देखील खाऊ शकता.
View this post on Instagram
वजन कमी करण्यासाठी कोणता योग करता येईल?
- सूर्यनमस्कार करा.
- नाव मुद्रा.
- भुजंगासन.
- चतुरंगदंडासन,
- ही आसने केल्याने वजन तर कमी होतेच पण ते नियमित केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
वजन कमी करण्यासाठी आणखी काही उपाय
स्वामी रामदेव यांनी सांगितले आहे की, कोणीही योग करू शकतो. दुधीचा रस पिणे देखील फायदेशीर ठरेल. याशिवाय उकडलेल्या भाज्यांचे सेवन करणेही फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही मड थेरपी देखील घेऊ शकता.
अश्वगंधाच्या पानांचे फायदे
- हे अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्मांनी समृद्ध आहेत, जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
- अश्वगंधाच्या पानांची पेस्ट बनवून जखमेवर लावल्याने जखम लवकर बरी होते.
- ही पाने थायरॉईडवरही उपचार करू शकतात.
- लैंगिक समस्यांसाठीही या पानांचा वापर करावा.
- वजन कमी करण्यात फायदेशीर.
हेही वाचा>>>
फक्त 4 नियम..अन् तरुणीने काही दिवसांतच तब्बल 20 किलो वजन कमी केलं, डाएट प्लॅन केला शेअर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )