Weekend Travel : स्वर्गसुखाचा अनुभव देणारं एक शांत गाव! भारतातील इस्रायल म्हणतात 'या' गावाला.. वीकेंडसाठी उत्तम ठिकाण, एकदा पाहाच..
Weekend Travel : जर तुम्हाला येणारा लाँग वीकेंड म्हणजेच जन्माष्टमीची सुट्टी घरी बसून घालवायची नसेल, आणि फिरण्यासाठी असे ठिकाण शोधत असाल तर, भारतातील असं एक गाव जे वीकेंड ट्रीपसाठी उत्तम ठिकाण आहे.
Weekend Travel : रोजच कामाचा ताण, नकोशी वाटणारी गर्दी.. नको वाटणारे ट्राफिक अन् गाड्यांच्या हॉर्नचे कर्कश आवाज...कधीतरी असे वाटते की, या सर्वांपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात निवांतपणा मिळावा, मग वाट कसली पाहताय? जर तुम्हाला येणारा लाँग वीकेंड म्हणजेच जन्माष्टमीची सुट्टी घरी बसून घालवायची नसेल, कमी बजेटमध्ये भरपूर मजा करता येईल असे ठिकाण शोधत असाल तर, भारतातील असं एक गाव वीकेंड ट्रीपसाठी उत्तम ठिकाण आहे. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. जिथे तुम्हाला पूर्ण मजा करता येईल.
ऑगस्ट महिन्यात आणखी एक मोठी सुट्टी येतेय
जन्माष्टमीचा उत्सव 26 ऑगस्ट रोजी आहे, जो सोमवारी आहे. जर तुम्हाला शनिवार-रविवार सुट्टी असेल, तर तुमच्याकडे काही आश्चर्यकारक ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी पूर्ण तीन दिवस आहेत. तसेच या लाँग वीकेंडसाठी तुम्ही काही प्लॅन करू शकत नसाल तर दु:खी होण्याची गरज नाही. ऑगस्ट महिन्यात आणखी एक मोठी सुट्टी येत आहे, जेव्हा तुम्ही प्रवासाची योजना करू शकता.
'हिमाचल प्रदेशचे इस्रायल'
हिमाचल प्रदेश हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. असेच एक गाव म्हणजे चालाल. जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. देशातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकांचेही हे आवडते ठिकाण आहे. या गावाला 'हिमाचल प्रदेशचे इस्रायल' असेही म्हणतात. कसालपासून फक्त 30 मिनिटांचा प्रवास करून तुम्ही या अद्भुत ठिकाणी पोहोचू शकता.
ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी प्रसिद्ध
पार्वती व्हॅली हे येथील आकर्षणाचे केंद्र आहे. ही व्हॅली फिरणे हा एक वेगळाच अनुभव आहे. चालाल गाव हे ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. कसालपासून चालाल गाव तीन किलोमीटरचा प्रवास आहे. म्हणजे ट्रेकिंग करूनही या गावात पोहोचता येते.
उत्तम कॅम्पिंग स्पॉट
ट्रेकिंगसोबतच कॅम्पिंगसाठी चालाल नदी हे उत्तम ठिकाण आहे. कॅम्पिंग करताना, आपण निसर्गाचा आनंद जवळून घेऊ शकता. रात्रीच्या वेळी मोकळ्या आकाशाखाली चांदण्या बघण्यात एक वेगळाच आराम मिळतो.
निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण
चालल गाव हे निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. घनदाट जंगलात फेरफटका मारून आणि शांत वातावरणाच्या सहवासात दोन-तीन दिवसांची सुट्टी कशी निघून जाईल हे कळणार नाही. हिंडताना पार्वती नदीचा आवाज तुम्हाला शांततेची अनुभूती देईल.
चालाल गावात कधी भेट द्याल?
चालाल गावाला भेट देण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम महिना असला तरी पावसाळ्यानंतर तुम्ही त्याचे नियोजन करू शकता.
हेही वाचा>>>
Travel : सप्टेंबरमध्ये बनेल बेस्ट पिकनिक प्लॅन! भारतातील 'ही' ठिकाणं पावसाळ्यात होतात आणखी सुंदर, कुटुंबासह फिरण्यासाठी आताच प्लॅन करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )