Vitamin D : मुलांना आजारांपासून दूर ठेवायचंय? व्हिटॅमिन डी समृद्ध 'हे' पदार्थ खायला द्या
Vitamin D for Kids : मुलांच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
Vitamin D Rich Food : शारीरिकरित्या तंदुरूस्त राहण्यासाठी शरीराला विविध पोषक तत्त्वांची गरज असते. लहान मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. मुलांच्या शारीरिक वाढीसाठी मुलांना कोणकोणते पदार्थ खायला द्यायचे याबाबत अनेक मातांना प्रश्न पडतो. मुलाच्या जन्मानंतर मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची गरज किती महत्वाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
मुलांच्या शारीरिक विकासासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते, त्यामुळे मुले वारंवार आजारी पडतात. मुलांच्या हाडांच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दातांच्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत तुम्ही मुलांना 'ड' जीवनसत्त्वाने युक्त आहार द्यावा. या गोष्टी तुम्ही बाळाला खाऊ शकता.
व्हिटॅमिन 'डी' युक्त पदार्थ :
1. अंडी : मुलांना अंडी खायला द्या. अंड्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी असते. मुलाला दररोज किमान एक अंडे द्या.
2. गाईचे दूध : दूध हे मुलांसाठी पूर्ण अन्न मानले जाते. अशा स्थितीत बाळाला दूध पाजावे. गाईचे दूध देण्याचा प्रयत्न करा. यामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असते. दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते.
3. दही : मुलांना जेवणात दही द्या. दही खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. दही पोटासाठीही फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दही जरूर खावे.
4. मशरूम : मशरूममध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1, बी2, बी5 आणि मॅग्नेशियम आढळतात. मशरूम देखील व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे.
5. संत्री : व्हिटॅमिन डी साठी तुम्ही मुलांना संत्री खाऊ शकता. संत्री हे खूप फायदेशीर फळ आहे. त्यात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आढळते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :