(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची प्लॅन्ट बेस्ड मटणाचा ब्रॅंड ब्लू ट्राईबमध्ये गुंतवणूक
Blue Tribe: ब्लू ट्राईब ब्रॅंडच्या माध्यमातून प्लॅन्ट बेस्ड मटणाची निर्मिती करण्यात येते.
मुंबई: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आता ब्लू ट्राईब या प्लॅन्ट बेस्ड मटणाच्या ब्रॅंडमध्ये गुंतवणूक केली आहे. हे दोघेही या ब्रँडचे गुंतवणूकदार असतील आणि ते ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करतील. रोपांवर आधारित मटणाच्या उत्पादनांचे प्रसारक आणि प्रचंड प्राणीप्रेमी असलेले विराट अनुष्का आपल्या आवडत्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी पर्यावरण आणि प्राणीप्रेमासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच प्लॅन्ट बेस्ड म्हणजे रोपांपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या ब्लू ट्राईब या ब्रॅंडमध्ये त्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लान्ट बेस्ड मांसाहारी खाद्यपदार्थांची चव आणि पोत पारंपरिक मांसाहारी पदार्थांसारखाच आहे.
अनुष्का शर्माने यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "विराट आणि मी कायमच प्राणीप्रेमी राहिलो आहोत. मागील अनेक वर्षांपासून आम्ही मांसाहारमुक्त जीवनशैली अंगिकारण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लू ट्राईबसोबतची आमची भागीदारी रोपांवर आधारित आहाराचे सेवन करून आपण पर्यावरणावर कशा प्रकारे कमी प्रभाव टाकू शकतो आणि लोक अधिक जागरूक होऊ शकतात हे दाखवण्यासाठी आहे. आम्हाला आशा आहे की, अधिकाधिक लोकांना त्याची गरज समजून घेणे आणि पर्यावरण तसेच येथील जीवन वाचवणे शक्य होईल."
ब्लू ट्राइब या ब्रॅंडची उत्पादने ही प्रामुख्याने मटार, सोयाबीन, कडधान्ये, धान्ये आणि इतर शाकाहारी घटकांनी बनवलेली आहेत.
प्लॅन्ट बेस्ड मटण म्हणजे काय?
प्लॅन्ट बेस्ड मटण हे वेगन टाईप किंवा शाकाहारी पद्धतीचे असते. ते प्रामुख्याने रोपांपासून बनवले जाते. आपल्या आवडीच्या पदार्थाच्या चवीमध्ये कोणतीही तडजोड न करता, अधिक सकस आणि पर्यावरणस्नेही उत्पादनांचे सेवन करू इच्छिणाऱ्या मांसाहारी व्यक्तींसाठी हे अधिक चांगलं आहे. त्यामुळे पर्यावरणाची समस्याही काही प्रमाणात कमी होते. प्लॅन्ट बेस्ड मटणामुळे प्रतिकिलो मटनामागे वातावरणात मुक्त केला जाणारा 6.9 किलो कार्बन डाय ऑक्साईड, 1800 लिटर पाणी वाचते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )