एक्स्प्लोर

Viral: नजर हटी..दुर्घटना घटी..प्रत्यक्षात पाहायचंय? मोबाईलच्या नादात आला रेल्वे रुळावर, घडलेल्या प्रकाराने काळजाचा ठोका चुकेल!

Viral: रेल्वे रुळावरून चालताना मोबाईल फोन वापरणे किती घातक ठरू शकते, याचे उदाहरण तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. मृत्यूने त्या व्यक्तीला कसा स्पर्श केला, हे तुम्हाला समजेल.

Viral: आपण नेहमी पाहतो, आजकालची पिढी ही मोबाईलमध्ये इतकी गुंतली जाते, की त्यांना आजूबाजूला काय घडतंय, याचं देखील भान राहत नाही. आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी आपल्याला वेळोवेळी सावधान करत असते, की रस्त्यावरून चालताना, गाडी चालवताता किंवा प्रवास करताना मोबाईल खिशात किंवा बॅगेत ठेवा, पण काहीजण एका कानाने ऐकतात, तर दुसऱ्या कानाने सोडून देतात. पण रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे रुळांवर चालताना मोबाईल पाहणे किती धोकादायक ठरू शकते, याची उदाहरणे अनेकवेळा समोर आली आहेत. याच्याशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नजर हटी..दुर्घटना घटी...याचं प्रत्यक्षात उदाहरण पाहायला मिळालं, एका व्यक्तीला मृत्यू कसा स्पर्श करून निघून गेला, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

मोबाईलचा नाद करणार होता घात... 

काही लोक रेल्वे रुळ ओलांडत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ट्रेन येताना पाहून बरेच लोक थांबले आणि ट्रेन सुटण्याची वाट पाहू लागले, पण इतक्यात एक व्यक्ती आली आणि रुळ ओलांडू लागली. त्याच्या हातात फोन होता आणि तो फोन बघत चालत होता. त्याचं लक्ष रुळांवर आणि ट्रेनकडे जात नव्हतं. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रेन आणि ती व्यक्ती दोघेही समोरासमोर आहेत आणि त्यांच्यामध्ये फक्त काही पावलांचे अंतर आहे. दरम्यान, त्या व्यक्तीची नजर ट्रेनवर पडली आणि तो मागे खेचला, तरीसुद्धा तो माणूस ट्रेनला धडकला. दुखापत जरी झाली असली तरी सुदैवाने तो रेल्वेरुळांच्या बाहेर पडल्याने मृत्यूपासून बचावला. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये ही घटना घडली.

View this post on Instagram
 
A post shared by Daily Mail (@dailymail)

महिलेने त्या पुरुषाला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही?

या घटनेनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून व्यक्तीची विचारपूस करून प्राथमिक उपचार केले, व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला केवळ किरकोळ जखमा झाल्याचे दिसते. तो माणूस रेल्वे ट्रॅकवर गेला तेव्हा शेजारी एक महिला उभी होती. महिलेने त्या पुरुषाला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही, यावर युजर्स सोशल मीडियावर कमेंट करत आहेत.

युजर्सच्या सोशल मीडियावर कमेंट्स

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, तिथे एक महिलाही उभी होती. तसेच त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. एकाने लिहिले की, फोन अनेकांचे जीव घेईल. दुसऱ्याने लिहिले की, तिथे उभी असलेली महिला बहुधा कोणाची आई नसावी, मी तिथे असते तर मी लगेच त्या व्यक्तीचा गळा पकडला असता. दुसऱ्याने लिहिले की मोबाईल फोन खूप धोकादायक आहे, तो प्राणघातक ठरू शकतो. 

हेही वाचा>>>

Viral: 15 फूट खोल विहीर..खोल पाण्यात नवरा-बायको गाडीसह पडले.. अचानक 'असा' घडला चमत्कार! सर्वांच्या भुवया उंचावल्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
Who Is Paddy Upton : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Sharad Pawar:राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कोणतेही मतप्रवाह नाही, Mahebub Shaikh यांची प्रतिक्रियाNCP Sharad Pawar News : शरद पवार पक्षात दोन मत प्रवाह; भाजपसह सत्तेत जावं एका गटाची मागणीBhandara Tiger News : झुडपात बसलेल्या वाघाला गावकऱ्यांचा विळघा, फोटो घेण्यासाठी गर्दीTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  13 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
Who Is Paddy Upton : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Sharad Pawar & BJP Talks: शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, अदानींच्या घरी बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला...
अदानींच्या घरी बैठक, भाजपसोबत जाण्याच्या हालचाली; शरद पवार गटांच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
Embed widget