Viral: महिलेने चक्क झोपून कमावले 9 लाख रूपये! नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का..असं घडलं तरी काय? एकदा वाचाच...
Viral: बेंगळूरू येथे एका महिलेने झोपून नऊ लाख रुपये जिंकले आहेत, तुम्हाला फक्त झोपून पैसे मिळत असतील तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
Viral: सध्या एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ती म्हणजे बेंगळुरूच्या एका महिलेने नुकतेच झोपून 9 लाख रुपये जिंकले आहेत, तसं पाहायला गेलं तर कोणतंही चांगलं काम करण्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. पण जर तुम्हाला फक्त झोपून पैसे मिळत असतील तर तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी असं घडलं तरी काय? एकदा वाचाच...
झोपून तब्बल नऊ लाख रुपये कमावले...
बेंगळुरूमधील एका महिलेने झोपून नऊ लाख रुपये कमावले आहेत. साईश्वरी पाटील नावाच्या तरुणीने एका स्टार्टअप कंपनीने आयोजित केलेल्या स्लीप चॅम्पियन स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावत 9 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. बदलती जीवनशैली, कामाच्या सवयी आणि सोशल मीडिया स्क्रोल करण्याची सवय यामुळे लोकांच्या झोपेच्या चक्रावर तसेच वेळेवर वाईट परिणाम झाला आहे.
स्लीप चॅम्पियन स्पर्धेत भाग घ्यायला तुम्हाला आवडेल?
वेकफिट नावाच्या स्टार्टअप कंपनीने बेंगळुरूमध्ये स्लीप चॅम्पियन स्पर्धा आयोजित केली होती. बेंगळुरू येथील इन्व्हेस्टमेंट बँकर साईश्वरी पाटील व्यतिरिक्त, या स्पर्धेत आणखी 11 स्पर्धकांची स्लीप इंटर्न म्हणून निवड करण्यात आली. वेकफिट स्टार्ट-अपच्या पहिल्या स्लीप इंटर्नशिप प्रोग्रामचा हा तिसरा सीझन आहे, ज्याची जबाबदारी साईश्वरी पाटील यांनी घेतली आहे. या कार्यक्रमात ज्या लोकांना चांगली झोप हवी आहे आणि कामामुळे आणि इतर कारणांमुळे झोप येत नाही अशांना प्रोत्साहन दिले जाते. या स्पर्धेत सर्व इंटर्नला दिवसभरात 20 मिनिटांची पॉवर डुलकी घेण्यासही प्रोत्साहन देण्यात येते. द हिंदूच्या रिपोर्टनुसार, झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, सर्व सहभागींना प्रीमियम दर्जाची मॅट्रेस आणि कॉन्टॅक्ट-लेस स्लीप ट्रॅकर देखील देण्यात आला.
कोविडमुळे दिनचर्या विस्कळीत झाली होती
साईश्वरी पाटील हिने सांगितले की, कोविडनंतर तिची दिनचर्या खूप विस्कळीत झाली होती. ऑडिटर म्हणून नोकरीच्या मागणीमुळे तिला झोपही येत होती. या स्पर्धेने शिस्तबद्ध स्लीपर कसे बनायचे हे शिकवल्याचे त्याने सांगितले. स्पर्धा जिंकण्याचा ताण आणि दडपण यांचा झोपेवरही परिणाम होत असल्याचे साईश्वरीने मान्य केले. "झोपेचा स्कोअर सुधारण्याचा विचार तणावपूर्ण होता. तुम्ही चांगल्या झोपेची तयारी कशी करता? या प्रश्नावर साईश्वरीने सांगितले की, अंतिम दिवशी, मी फक्त शांत आणि चांगली झोप कशी येईल यावर लक्ष केंद्रित केले..
हेही वाचा>>>
Viral:भारतातील अजब गाव.. विचित्र परंपरा! जिथे स्त्रिया 5 दिवस कपड्यांशिवाय राहतात, मासिक पाळी आल्यावर तर....
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )