Viral:भारतातील अजब गाव.. विचित्र परंपरा! जिथे स्त्रिया 5 दिवस कपड्यांशिवाय राहतात, मासिक पाळी आल्यावर तर....
Viral: एक विचित्र परंपरा भारतातील एका गावात पाहायला मिळते. जिथे महिला 5 दिवस कपड्यांशिवाय राहतात. यादरम्यान पुरूष कोणत्याही महिलेकडे ढुंकूनही पाहत नाही.
Viral: भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे, या देशात विविध संस्कृती, परंपरा पाहायला मिळतात, ज्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. अनेक गावात वर्षोनुवर्षे चालत आलेल्या परंपरा आजही लोक पाळतात. तर काही ठिकाणी खूप विचित्र परंपरा पाहायला मिळतात. ज्यांच्याबद्दल आपल्याला अनेकदा माहितीही नसते. अशा काही परंपरा आहेत जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. अशीच एक विचित्र परंपरा भारतातील एका गावात पाहायला मिळते. जिथे महिला 5 दिवस कपड्यांशिवाय राहतात. नेमकी काय आहे ही परंपरा? जाणून घ्या..
जी स्त्री ही परंपरा पाळत नाही, तिला....
एका वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिनी गावात ही परंपरा पाळली जाते. हे दरवर्षी श्रावण महिन्यात होते. असे म्हणतात की, जी स्त्री ही परंपरा पाळत नाही तिला काही दिवसातच वाईट बातमी ऐकायला मिळते. या काळात स्त्रियांना मासिक पाळी आली तरी त्यांना फक्त लोकरीचा पट्टा बांधण्याची परवानगी आहे. इथल्या पुरुषांचाही या 5 दिवसांसाठी स्वतःवर पूर्ण ताबा असतो. यादरम्यान तो कोणत्याही महिलेकडे ढुंकूनही पाहत नाही. याशिवाय या काळात ते मांस आणि अल्कोहोलसारख्या गोष्टींना हातही लावत नाही. असे केल्याने त्या लोकांचे भविष्य चांगले राहते, अशी श्रद्धा आहे.
....तर देवतांचा कोप होतो
या काळात पती-पत्नी संपूर्ण गावात एकमेकांपासून दूर राहतात. ते एकमेकांशी बोलतही नाहीत. बायकोकडे पाहून त्याला हसूही येत नाही. तिथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, जर माणसाने परंपरा नीट पाळली नाही तर देवतांचा कोप होतो. कोपलेले देव त्यांचेही गावाचे नुकसान करू शकतात. अशी लोकांची धारणा आहे.
अशी सुरू झाली विचित्र परंपरा
गावातील लोकांचे म्हणणे आहे की, फार पूर्वी या गावात राक्षसांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यावेळी 'लहुआ घोंड' नावाचा देव पिनी गावात आला. त्याने राक्षसाचा वध केला. लोकांचा असा विश्वास आहे की, ते राक्षस गावातील सुंदर कपडे घातलेल्या विवाहित स्त्रियांना पळवून नेत असत. जेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्ध होते, तेव्हा महिलांनी 5 दिवस कपडे घातले नाहीत. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. स्त्रिया कपड्यात सुंदर दिसल्या तर आजही भूत त्यांना हरवून नेतील, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.
हेही वाचा>>>
Women Health : मासिक पाळी दरम्यान पूजा करावी की नाही? प्रेमानंद महाराजांनी दिले आश्चर्यकारक उत्तर, तर जया किशोरी म्हणतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )