Travel : मे-जूनमध्ये फिरायला जायचंय.. पण बजेटची अडचण? भारतीय रेल्वेची कमी बजेटमध्ये खास टूर ऑफर
Travel : कमी बजेट असणाऱ्या लोकांसाठी IRCTC ची खास ऑफर आहे, या पॅकेजेसद्वारे उन्हाळ्याच्या सुट्टीची योजना करा
Travel : देशासह राज्यात सध्या कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी पावसाचा जोर दिसतोय. मात्र देशातील अशी काही ठिकाणं आहेत, जिथे गेल्यानंतर तुम्हाला चहू बाजूस निसर्गसौंदर्य आणि सुखद गारवा अनुभवायला मिळेल. भारतीय रेल्वे (IRCTC) तुम्हाला कमी बजेटमध्ये खास टूर पॅकेज ऑफर देत आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही मे-जूनमध्ये आपल्या आवडत्या ठिकाणी बिनधास्त फिरू शकता, कारण भारतीय रेल्वेच्या या टूर पॅकेजमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी राउंड ट्रिप ट्रेन आणि फ्लाइट तिकीट, राहण्यासाठी हॉटेल, प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. म्हणजे एकदा तुम्ही बुकींग केली की तुम्हाला इतर काही पाहण्याची गरज नाही.
भारतीय रेल्वेच्या पॅकेजमध्ये कमी बजेटमध्ये विविध सुविधा...
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहलींचे नियोजन करणारे लोक सहसा पॅकेजसह प्रवास करण्याचा विचार करतात. जर तुम्हाला कुटुंबासह सहलीचे नियोजन करायचे असेल तर भारतीय रेल्वेच्या या टूर पॅकेजसह प्रवास करणे सोपे आहे. कारण प्रत्येक पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वेच्या पॅकेजमध्ये तुम्हाला प्रेक्षणीय स्थळे, भोजन आणि हॉटेलच्या सुविधांपर्यंतच्या सुविधाही दिल्या जातात.
बिनधास्त ट्रीप एन्जॉय करा..
याव्यतिरिक्त, या पॅकेजमध्ये तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी बस आणि कॅबची सुविधा देखील प्रदान करते. त्यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आजच्या लेखात, आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या काही खास टूर पॅकेजची माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय तुमच्या संपूर्ण कुटुंबासह सहलीला जाऊ शकता.
गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेज
उन्हाळ्यात भेट देण्याच्या चांगल्या ठिकाणांपैकी हे एक आहे.
या पॅकेजसाठी तुम्ही कधीही तिकीट बुक करू शकता.
पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
विमानाने प्रवास सुरू होईल.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 26,490 रुपये आहे.
जर तुम्ही मुलांना सोबत घेत असाल तर तुम्हाला 21,130 रुपये वेगळे द्यावे लागतील.
लखनौ ते चंदीगड, कुफरी आणि शिमला टूर पॅकेज
या पॅकेजमध्ये तुम्हाला एकाच वेळी 3 ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
हे पॅकेज 24 मेपासून सुरू होणार आहे. यानंतर तुम्ही दर शुक्रवारी तिकीट बुक करू शकता.
हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
या पॅकेजमध्ये रेल्वे प्रवासाचा समावेश असेल.
पॅकेज फी - तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25050 आहे.
जर तुम्ही मुलांना सोबत घेत असाल तर तुम्हाला 14060 रुपये वेगळे द्यावे लागतील.
भोपाळ, ओंकारेश्वर, साची आणि उज्जैन टूर पॅकेज
हे पॅकेज 22 मे पासून हैदराबाद येथून सुरू होणार आहे. यानंतर तुम्ही दर बुधवारी पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकता.
पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. लांबच्या सहलीला जाणाऱ्या लोकांसाठी हे पॅकेज चांगले आहे.
ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये प्रवास करण्यासाठी तीन जणांना प्रति व्यक्ती 11720 रुपये मोजावे लागतील.
मुलांना सोबत घेतल्यास 9420 रुपये वेगळे द्यावे लागतील.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून पॅकेज तिकीट बुक करू शकता.
हेही वाचा>>>
Travel : काय तो पाऊस.. काय ती थंड हवा..काय ते धबधबे.. हिरवाईने नटलेल्या महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशनची बातच न्यारी! हनिमून कपल्ससाठी स्वर्गच जणू
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )