(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : पर्यटक बोलतील Wow..जणू स्वर्ग भासावे महाराष्ट्रातील 'हे' ठिकाण! धबधबे.. धरण.. उंच पर्वत..बरंच काही..
Travel : महाराष्ट्रातील या हिल स्टेशनचे सौंदर्य पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला हिमाचल, उत्तराखंड किंवा केरळला जायला आवडणार नाही. निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे
Travel : मे महिना संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात पर्यटक आता विविध ठिकाणी एक्सप्लोर करण्यासाठी प्लॅनिंगला सुरूवात करतील. जून महिन्यात मान्सूनची चाहूल लागताच निसर्ग एकदम रूपच पालटतो. कारण तेव्हा पावसाचे आगमन होणार असते, आणि निसर्ग त्याच्या स्वागताच्या तयारीला लागतो. अशात आपण जेव्हा जेव्हा हिल स्टेशनचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वप्रथम हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा ईशान्येकडील स्थळांचा असतो. पण, देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर एक हिल स्टेशन आहे, जे कोणत्याही निसर्गप्रेमीसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. आपल्या निसर्गसौंदर्याने कोणालाही प्रेमात पाडेल अशा या ठिकाणी तुम्हालाही जायला आवडेल ना? मग जाणून घ्या या ठिकाणाबद्दल..
हिमाचल, उत्तराखंडपेक्षा कमी नाही हे ठिकाण!
महाराष्ट्र-मुंबईला राहणाऱ्या लोकांसाठी आणि या शहरांच्या आसपासची ठिकाणे हिमाचल आणि उत्तराखंडच्या कोणत्याही हिल स्टेशनपेक्षा कमी नाहीत. या हिल स्टेशनचा खरा रंग पावसाळ्यातच दिसून येतो. पावसाळ्यात येथे पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असते. हे ठिकाण प्राचीन किल्ला, भव्य धबधबे आणि उंच पर्वतांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला इगतपुरीमध्ये भेट देण्यासाठी काही उत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या..
कळसूबाई शिखर
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कळसूबाई शिखर हे स्थानिक आणि इतर पर्यटकांसाठी इगतपुरीतील सर्वात आवडते ठिकाण आहे. इथले स्थानिक लोक हे शिखर माउंट एव्हरेस्ट म्हणूनही ओळखतात. या शिखरावरून आजूबाजूचा निसर्ग नयनरम्य आहे. पावसाळ्यात पर्वतांचे चित्तथरारक दृश्य पाहिल्यानंतर कदाचित प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी जायला आवडेल. हे शिखर ट्रेकिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे.
कसारा घाट
इगतपुरी जवळ एक उत्कृष्ट आणि सुंदर ठिकाण जे कोणत्याही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे. होय, हिरवाईने भरलेला आणि डोंगरांनी वेढलेला कसारा घाट कोणत्याही पर्यटकासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. या ठिकाणाभोवती असलेले धबधबे हे निसर्गसौंदर्याचे सुंदर उदाहरण आहेत. पावसाळ्यात हे ठिकाण धुक्यात आच्छादलेले असताना सर्वजण त्याकडे पाहत राहतात. जर तुम्हाला महाराष्ट्र आणि मुंबईपासून दूर असलेल्या निवांत ठिकाणी जायला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्यावी.
त्रिंगलवाडी किल्ला
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केला होता की हे ठिकाण प्राचीन किल्ल्यासाठी देखील ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेला हा किल्ला इतिहासप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे. निसर्गासोबतच इगतपुरीचा इतिहास जवळून जाणून घ्यायचा असेल तर इथे नक्की पोहोचावे. कुटुंब आणि मित्रांसोबत या ठिकाणी जाण्याची एक वेगळीच मजा आहे. अनेकांना ट्रेकिंगसाठी या किल्ल्याभोवतीची जागा आवडते.
भावली धरण
इगतपुरीमध्ये असलेले हे धरण पिकनिक स्पॉट म्हणून विशेष पसंत केले जाते. वीकेंडमध्ये, स्थानिक लोक तसेच दूरच्या ठिकाणचे लोक कुटुंब किंवा मित्रांसह सहलीसाठी या ठिकाणी येतात. जर तुम्ही इगतपुरीमध्ये शांत जागा शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. या चार ठिकाणांव्यतिरिक्त, आपण वॉटर स्पोर्ट्स आणि कॅम्पिंगसह विहिगाव धबधबा देखील पाहू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : लोणावळा, खंडाळ्याला जाऊन कंटाळलात, शांत.. निवांत.. महाराष्ट्रातील 'एक' हिल स्टेशन! महाभारत काळातील अनेक रहस्य इथे लपलीत