Travel : रक्षाबंधनसोबत लॉंग वीकेंड असेल खास! जेव्हा बहिणीसोबत 'ही' 5 ठिकाणं एक्सप्लोर कराल, आतापासूनच तयारी करा
Travel : यंदा रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन या दरम्यान वीकेंडची सुट्टी आहे. त्यामुळे लॉंग वीकेंडचे दोन ते तीन दिवस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही आपल्या भाऊ बहिणींसोबत सहलीला जाऊ शकतात.
Travel : वेड्या बहिणीची वेडी ही माया... ही मराठी गाणं आपल्या सर्वांनाच माहित असेल खरंच बहिणीचं प्रेम..तिची माया जगावेगळीच असते. केवळ रक्षाबंधन पुरतेच नाही, तर आयुष्यातील प्रत्येक क्षणी भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो. भाऊ-बहिणीशी संबंधित हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो, या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणींच्या रक्षणाचे वचन देतात.
तुमचा रक्षाबंधन अविस्मरणीय पद्धतीने साजरा करा
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहीण एकमेकांसोबत वेळ घालवतात. या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि सणाच्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतात. यंदा रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन या दरम्यान वीकेंडची सुट्टी आहे. त्यामुळे लॉंग वीकेंडचे दोन ते तीन दिवस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही आपल्या भाऊ बहिणींसोबत सहलीला जाऊ शकतात. ज्यामुळे तुमचा रक्षाबंधन अविस्मरणीय पद्धतीने साजरा होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या सुट्टीत भेट देण्याच्या काही सुंदर ठिकाणांची माहिती आम्ही देत आहोत, जिथे भाऊ आणि बहिणी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह फिरू शकतात.
ऋषिकेश
ऋषिकेश हे उत्तराखंडमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे, जिथे भारत आणि परदेशातील लोक वर्षभर भेट देण्यासाठी येतात. ऋषिकेश हे एक लहान आणि शांत शहर आहे, जिथे पाहण्यासारखे खूप काही आहे. कमी पैशात ऋषिकेशला सहज भेट देता येते. जर तुम्हाला साहसाची आवड असेल तर तुम्ही गंगा नदीच्या पाण्यात राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्ही ऋषिकेशमध्ये कॅम्पिंगही करू शकता. तुम्ही मंदिरांना भेट देऊ शकता, सकाळी गंगेच्या काठावर योग आणि ध्यान करू शकता.
मुन्नार
केरळ हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही कुटुंबासह केरळमधील मुन्नार शहराला भेट देऊ शकता. मुन्नारचे हवामान वर्षभर खूप आल्हाददायक असते, म्हणजे फार गरम किंवा खूप थंड नसते. मुन्नारमध्ये निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे वेळ घालवता येतो.
जैसलमेर
राजस्थानातील जवळजवळ प्रत्येक शहर कुटुंबासह भेट देण्यासाठी आश्चर्यकारक आहे. मात्र, पावसाळ्यात तुम्ही जैसलमेर किंवा उदयपूरला जाऊ शकता. जैसलमेरमध्ये अनेक किल्ले आहेत, जे तुम्हाला राजे-महाराजांच्या काळात घेऊन जातात. येथे वाळवंटात तुम्ही कॅमल सफारीचा आनंद घेऊ शकता. तलावांचे शहर उदयपूरला भेट दिल्याने तुम्हाला एक चांगला अनुभव मिळेल.
मथुरा-वृंदावन
मथुरा वृंदावन हे भाऊ आणि बहिणींसाठी रक्षाबंधनाच्या सुट्टीत भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. मथुरा-वृंदावन भाऊ-बहिणीच्या नात्याची कथा सांगते. असे म्हटले जाते की मथुराची पवित्र नदी यमुना ही भगवान यमाची बहीण आहे. रक्षाबंधन किंवा भाईदूजच्या दिवशी भाऊ-बहिणींनी यमुनेत स्नान केल्यास भगवान यम त्यांच्या सर्व समस्या दूर करतात. मथुरामध्ये भेट देण्यासाठी अनेक प्राचीन कृष्ण राधा मंदिरे आहेत ज्यात कृष्ण जन्मभूमी, बांके बिहारी मंदिर, गोवर्धन पर्वत, द्वारकाधीश मंदिर यांचा समावेश आहे जेथे तुम्ही कुटुंबासह भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : टिव्ही, मोबाईलपासून दूर नेत मुलांना द्या देशभक्तीचे धडे! 15 ऑगस्टला भारतातील 'या' ऐतिहासिक ठिकाणी भेट द्या, गर्दी टाळायची तर असं नियोजन करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )