(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : जूनमध्ये लाँग वीकेंडला करा धम्माल! ट्रीप प्लॅन करताय तर 'ही' ठिकाणं फिरण्यासाठी Best, मुलं होतील खूश
Travel : तसं पाहायला गेलं तर जूनमध्ये पावसाचे आगमन होते, वातावरण थंड असते, आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे यंदा 2024 मध्ये लॉंग वीकेंडची सुवर्धसंधी मिळत आहे.
Travel : सध्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. उष्णतेची लाट तसेच कडक उन्हामुळे अनेकांनी घरीच राहणं पसंत केलंय, पण आता जून महिना सुरू होत आहे. जूनच्या सुरूवातीच्या दिवसात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागते. त्यामुळे वातावरण तितकं गरम नसतं. जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे मुलांना तसेच पालकांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद उपभोगण्याची संधी मिळते. तसं पाहायला गेलं तर जूनमध्ये पावसाचे आगमन होते, वातावरण थंड असते, आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे यंदा 2024 मध्ये लॉंग वीकेंडची सुवर्धसंधी मिळत आहे. तुम्हालाही ही संधी सोडायची नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही जूनचा हा वीकेंड आनंदात घालवाल... जाणून घ्या..
सुट्टीत मुलांचा आजी-आजोबांच्या घरी नाही, तर पिकनिकला जायचा आग्रह असतो
अगोदर उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं आजी-आजोबांच्या घरी जायची, पण आता मुलांकडून कौटुंबिक सहलीला जाण्याचा आग्रह धरला जातो. त्यामुळे पालकही थंड आणि शांत ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतात. कुटुंबासोबत काही संस्मरणीय आणि मनोरंजक क्षण घालवण्यासाठी पालकांनाही हिल स्टेशनला भेट द्यायला आवडते. मात्र एकच अडचण असते, ती म्हणजे मुलांप्रमाणे नोकरदार पालकांना ऑफिसमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळत नाहीत, त्यांना सुट्टीची वाट पाहावी लागते किंवा घ्यावी लागते. जून महिन्यात सुट्ट्या कधी आहेत आणि या महिन्यात किती लॉंग वीकेंड्स आहेत? हे जाणून घेऊन तुम्ही मुले आणि जोडीदारासोबत प्रवास करण्याचं प्लॅनिंग करू शकता.
जूनमध्ये किती सुट्ट्या आणि किती लॉंग वीकेंड?
तसं पाहायला गेलं तर जून महिन्यात फारशा सुट्ट्या नाहीत. जून महिन्यात फक्त एक दिवस सुट्टी आहे. ती म्हणजे सोमवार, 17 जून रोजी बकरीदची सुट्टी आहे. यानिमित्ताने सहलीला जाता येईल. विशेष म्हणजे जर तुम्ही जूनमध्ये 15 तारखेपासून तुम्ही लाँग वीकेंडचा आनंद घेऊ शकता. 15 आणि 16 जून रोजी शनिवार-रविवार सुट्टी आहे, तर दुसऱ्या दिवशी बकरीदची सुट्टी असेल. अशा परिस्थितीत, तीन दिवसांच्या सुट्टीत, आपण कमी तापमान असलेल्या सुंदर ठिकाणी जाऊ शकता. याशिवाय 1 आणि 2 जून, 8 आणि 9 जून, 22 आणि 23 जून आणि 29-30 जूनला दोन दिवसांच्या वीकेंड ट्रिपला जाता येईल. जवळपासच्या कोणत्याही हिल स्टेशनला दोन दिवसात सहज आणि स्वस्तात भेट देता येते. तसेच ऑफिसमध्ये आणखी एका दिवसाची सुट्टी टाकली तर मोठा वीकेंड मिळू शकतो.
जूनमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं
जर तुमच्याकडे प्रवासासाठी जास्त सुट्ट्या नसतील तर तुम्ही हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन्सच्या सहलीला जाऊ शकता. या दिवसात तापमान 40 अंशांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक हिल स्टेशनमध्ये हवामान थंड असू शकते. तुम्ही कसोल, कुफरी, मनाली, लॅन्सडाउन आणि धर्मशाला येथे जाऊ शकता. येथे तुम्ही आश्चर्यकारक नैसर्गिक दृश्यांमध्ये साहसी अॅक्टीव्हीटीचा आनंद देखील घेऊ शकता किंवा शांत वातावरणात आनंदी वेळ घालवू शकता.
काश्मीरमध्ये सुट्टी एन्जॉय करा..!
जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. काश्मीरमधील जवळपास प्रत्येक शहर हे एक पर्यटन स्थळ आहे. श्रीनगर ते गुलमर्ग आणि पहलगाम ते सोनमर्ग असा प्रवास करता येतो. इथली हिरवळ, सुंदर दऱ्या, तलाव आणि निसर्गरम्य नजारे विलोभनीय आहेत. जून महिन्यात ऑफिसमधून जास्त रजा मिळाल्यास काश्मीरच्या सहलीला नक्की जा.
हेही वाचा>>>
Travel : जुलैचा गुलाबी महिना अन् जोडीदार सोबतीला, भारतीय रेल्वेकडून खास टूर पॅकेज! आठवणीत राहील ट्रिप..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )