Travel: भगवान महादेवांच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! केदारनाथ धामचे दरवाजे लवकरच बंद होणार, दर्शन कधीपर्यंत घेता येईल?
Travel: जर तुम्ही भगवान केदारनाथ धामला (Kedarnath Dham) जाण्याचा विचार करीत असाल तर ते लवकर करा. कारण केदानारथ धामचे दरवाजे बंद होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Travel: भगवान महादेवांच्या (Lord Mahadev) भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही भगवान केदारनाथ धामला जाण्याचा विचार करताय? तर तुम्हाला लवकर प्लॅन करावा लागेल. कारण केदानारथ धामचे (Kedarnath Dham) दरवाजे बंद होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने याची घोषणा केली आहे.
चार-धामचे दरवाजे बंद होण्याची तारीख जाहीर
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने याची घोषणा केली आहे. हिवाळ्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातील. यासंदर्भात मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केदारनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता बंद होतील. परंपरेनुसार, हिवाळ्यात भाऊबीज निमित्ताने केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातील. याचे कारण म्हणजे, चार धाम समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असल्याने, थंडी अधिक असते. ज्यामुळे येथे पोहोचण्याचा मार्ग देखील अवघड असतो, हिवाळ्यात तर हा मार्ग आणखी कठीण होतो. उंचीवर जाताना, अत्यधिक सर्दीमुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास देखील होऊ शकतो. सुविधांच्या अभावामुळे लोकांना मदत मिळविण्यातही त्रास होऊ शकतो. थंडीच्या वेळी या भागात मोठ्या प्रमाणात हिमवर्षावाची देखील शक्यता नाकारता येत नाही. हेच कारण आहे की, भाऊबीज नंतर बाबा केदारनाथचे दर्शन थांबवण्यात येत आहे. यानंतर, चार धामचे दरवाजे उघडण्याची तारीख महाशिवरात्र निमित्त जाहीर केली जाते.
शतकानुशतके जुनी परंपरा..!
शतकानुशतके परंपरेनुसार, दरवाजे बंद झाल्यानंतर बाबा केदारनाथ यांची पालखी उखिमथमधील ओंकारेश्वर मंदिरासाठी रवाना होते, त्यानंतर बाबांच्या रात्रीची विश्रांतीसाठी रामपूरमध्ये थांबतात. जो केदारनाथ धामपासून सुमारे 18 किलोमीटर खाली आहे. उखिमथची तरुण मंडळी बाबांची पालखी त्यांच्या खांद्यावर फिरतात. ज्यानंतर भैरव व्हॅली जंगल चट्टी मार्गे बाबांची पालखी गौरीकुंडला पोहोचते. जिथे बाबांचं स्वागत आणि पूजा केली जाते, अशी धारणा आहे
केदारनाथ धामचे दरवाजे कधी उघडणार?
मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर बाबा केदारनाथची पालखी हिवाळ्यातील सिंहासनाच्या जागेकडे जाईल. यानंतर, केदारनाथनाथ मंदिराचे दरवाजे पुढच्या वर्षी उघडले जातील. यावर्षी, 10 मे 2024 रोजी मंदिराचे दरवाजे उघडले गेले.
हेही वाचा>>>
Navratri 2024 Travel: देवीचे एक अद्भूत मंदिर, जिथे साक्षात पिंडीच्या रूपात देवी विराजमान, पिंडीतून सतत वाहणाऱ्या पाण्याचे रहस्य काय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )