Travel : पांडवांनी एका रात्रीत बांधले महाराष्ट्रातील 'हे' चमत्कारी शिवमंदिर? पंचवटीला जाण्याचा गुप्त मार्गही इथूनच? इतिहास सांगतो...
Travel : मंदिराविषयी भाविकांची अशी धारणा आहे की, संपूर्ण जगात या मंदिरासारखे मंदिर नाही. या शिव मंदिराजवळ असे अनेक चमत्कार घडतात, ज्यामुळे ते प्रचलित आहे.
Travel : धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव हे विश्वाच्या निर्मितीचे, अस्तित्वाचे आणि विनाशाचे स्वामी आहेत. शिवाचा अर्थ हितकारक मानला जात असला तरी त्याच्या नियंत्रणात लय आणि विनाश दोन्ही असतात. भारतात अशी अनेक भगवान शिव तसेच शिवलिंग असलेली मंदिरं आहेत. ज्याच्या दर्शनासाठी अनेक भाविक दुरून येत असतात. या मंदिरांबाबत अनेक आख्यायिका तसेच चमत्कारही सांगितले जातात. असंच एक मंदिर महाराष्ट्रातही आहे, ज्याच्याबद्दल असे सांगितले जाते की, हे मंदिर पांडवांनी केवळ एका रात्रीत बांधले. काय आहे यामागील नेमका इतिहास तसेच या मंदिराच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या...
पांडवकालीन मंदिर
महाराष्ट्रातील मुंबईजवळ अंबरनाथ शहरात एक शिवमंदिर आहे जे अंबरनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पांडवकालीन मंदिर असल्याचेही म्हटले जाते. मंदिरात सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर 1060 मध्ये राजा मंबानी यांनी बांधले होते. मंदिराविषयी भाविक म्हणतात की, संपूर्ण जगात या मंदिरासारखे मंदिर नाही. अंबरनाथ शिव मंदिराजवळ असे अनेक चमत्कार घडतात, ज्यामुळे त्याची ओळख वाढते.
पंचवटीला जाणारा गुप्त मार्ग इथूनच?
अंबरनाथ शिव मंदिर त्याच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराबाहेर दोन नंदी बैल आहेत. मंदिराच्या प्रवेशासाठी तीन मुखमंडप आहेत. आत गेल्यावर आपण सभामंडपापाशी पोहोचतो आणि सभामंडपा नंतर 9 पायऱ्यांच्या तळाशी गर्भगृह आहे. मंदिराचे मुख्य शिवलिंग त्रिमस्तीचे आहे आणि तिच्या गुडघ्यावर एक स्त्री आहे, जी शिव-पार्वतीचे रूप दर्शवते. हे मंदिर झाडांच्या मधोमध वसलेले आहे. या मंदिराच्या गर्भगृहाजवळ एक गरम पाण्याचे तळे देखील आहे. या मंदिराजवळ एक गुहा आहे, ज्याला पंचवटीला जाणारा मार्ग असल्याचे सांगितले जाते. युनेस्कोने अंबरनाथ शिव मंदिराला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. वालधन नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आंबा आणि चिंचेच्या झाडांनी वेढलेले आहे.
आकर्षक शिल्प
या मंदिराची वास्तू भव्य आहे, देश-विदेशातून अनेक लोक येथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर शिवाची अनेक रूपे कोरलेली आहेत. यासोबतच गणेश, कार्तिकेय, चंडिका आदी देव-देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. याशिवाय देवी दुर्गा राक्षसांचा नाश करते असे चित्रण आहे.
एका रात्रीत बांधले गेले मंदिर?
पौराणिक मान्यतेनुसार, पांडवांनी वनवासात काही वर्षे अंबरनाथमध्ये घालवली, त्यानंतर एका रात्रीत मोठमोठ्या दगडांनी हे मंदिर बांधले, असे सांगितले जाते. यानंतर पांडवांनी कौरवांच्या भीतीने हे ठिकाण सोडले. त्यामुळे मंदिराचे काम पूर्ण होऊ शकले नाही. हे मंदिर आजही उभे आहे.
यापूर्वी व्हायची ब्रह्मदेवाची पूजा?
पौराणिक मान्यतेनुसार, या मंदिराच्या आत आणि बाहेर ब्रह्मदेवाच्या किमान 8 मूर्ती आहेत. आजूबाजूला अनेक ठिकाणी ब्रह्मदेवाच्या प्राचीन मूर्ती आहेत, यावरून स्पष्ट होते की, पूर्वी येथे ब्रह्मदेवाची पूजा केली जात होती. शिवरात्रीनिमित्त येथे जत्रा भरते. ही जत्रा तीन ते चार दिवस चालते आणि या जत्रेत मोठी गर्दी असते.
हेही वाचा>>>
Travel : तिरुपती..उज्जैन..लडाख..भारतीय रेल्वेकडून जुलै-ऑगस्टमध्ये फिरण्याची संधी! किती खर्च येईल? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )