Summer Fashion : फ्लोरल, प्रिंटेड कि प्लेन? उन्हाळ्यात कोणते ड्रेस दिसतील बेस्ट? निवडा डिझाईन, दिसा स्टायलिश!
Summer Fashion : आज आम्ही तुम्हाला बदलत्या ऋतूमध्ये कपड्यांचे परफेक्ट डिझाइन आणि पॅटर्न सांगणार आहोत. उन्हाळ्यात स्टाईल करण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या..
Summer Fashion : उन्हाळ्यात (Summer) घराबाहेर पडायचं म्हणजे नको वाटतं. बाहेर कडक ऊन, घामाच्या धारा, मेकअप तर क्षणात उतरून जातो, पण कामानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर पडावं लागतं, अशात कपडे कोणते घालायचे हा प्रश्न महिला वर्गाला पडतो. आता उन्हाळ्यातही तुम्ही फॅशन करू शकता, आणि तुम्हाला सूट होतील असे कपडे घालू शकता, ज्यामध्ये फ्लोरल (Floral), प्रिंटेड (Printed), प्लेन (Plain) असे विविध प्रकारचे कपडे तुम्हाला परिधान करता येतील, यामुळे तुमची फॅशनही होईल, आणि उन्हाळ्यात गरमी पासूनही बचाव होईल. उन्हाळ्यातील स्टायलिश लुक मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरानुसार डिझाईन निवडू शकता. आज आम्ही तुम्हाला बदलत्या ऋतूमध्ये कपड्यांचे परफेक्ट डिझाइन आणि पॅटर्न सांगणार आहोत. उन्हाळ्यात स्टाईल करण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या..
ट्रेंडी आउटफिट्स कॅरी करा!
उन्हाळा सुरू होताच लोक आपली वेशभूषा बदलू लागतात. अशात, जर तुम्हीही या सीझनमध्ये स्टायलिश आणि आरामदायक असे काहीतरी शोधत असाल तर तुम्ही हे ट्रेंडी आउटफिट्स कॅरी करू शकता, जाणून घ्या
प्रिंटेड डिझाइनचे कपडे भारी!
उन्हाळ्यात हलक्या वजनाच्या कपड्यांना प्राधान्य दिले जाते. तर हलक्या वजनाच्या साड्या तुम्हाला उन्हाळ्यात सहज-सुंदर लुक देण्यास मदत करतील. बहुतेक सलवार-सूट, साड्या किंवा पाश्चात्य पोशाख प्रिंटेडमध्ये दिसतील. मुख्यतः फुलांच्या, हृदयाच्या किंवा धनुष्याच्या डिझाइनला प्रिंटमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
फ्लोरल डिझाईन उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम
फुलांची डिझाईन अतिशय सहज-सुंदर लुक देण्यास मदत करते. जर तुम्ही प्लस साइजचे असाल तर तुम्ही फ्लोरलमध्ये छोट्या पॅटर्नच्या डिझाइनची निवड करावी. जर तुम्ही पातळ असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे डिझाइन निवडू शकता. या प्रकारच्या फ्लोरल डिझाईनमध्ये तुम्हाला प्रिंटेड, एम्ब्रॉयडरी, चिकनकारी अशा अनेक डिझाईन्स सहज मिळतील.
प्लेन कपडे कसे स्टाईल कराल?
प्लेन डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये, बहुतेक कॉटन फॅब्रिकला प्राधान्य दिले जाते. कारण कॉटन फॅब्रिक हे त्वचेला अनुकूल असते. कॉटन फॅब्रिक देखील खूप मोहक दिसते. यामध्ये तुम्ही लूज साइज कुर्ती-पँट सेट स्टाईल करू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>