Skin Care Tips : कडक उन्हापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करणाऱ्या सनस्क्रिन संबंधित काही महत्वाच्या टिप्स...
Skin Care Tips : सनस्क्रीनच्या वापराने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण तर होतेच, पण त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे.
Skin Care Tips : जेव्हा चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व किंवा सुरकुत्या दिसू लागतात किंवा त्वचा टॅन होऊन त्वचेचा रंग गडद होऊ लागतो. तेव्हा हे समजून जावे तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावण्याची आवश्यकता आहे. त्वचेशी संबंधित या समस्या टाळण्यासाठी तुम्ही एखादे चांगले UV क्रीम म्हणजेच सनस्क्रीन क्रीम वापरले पाहिजे. आपण वर्षाचे बाराही महिने सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन लावले पाहिजे. खरं तर सूर्याची किरणे आणि खास करून UV किरणे तर ढगांमधूनही आरपार जाऊ शकतात आणि त्वचेचे नुकसान करू शकतात, म्हणून वर्षाचे सगळे दिवस आपण बाहेर जाताना केवळ चेहेऱ्यालाच नव्हे तर सर्व दृश्य भागाला सनस्क्रीन लावले पाहिजे. याच्या वापराने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण तर होतेच, पण त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे. या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा यांनी पायांच्या तळव्यांची योग्य काळजी कशी घ्यावी याविषयी काही टीप्स दिल्या आहेत.
योग्य सनस्क्रिन कसे निवडावे ?
सनस्क्रिन खरेदी करताना या गोष्टींकडे नीट लक्ष द्या.
1. broad spectrum sunscreen : यामुळे दोन प्रकारच्या व्हेरिएशनमुळे संरक्षण मिळते. 1. UV आणि 2. UVB
2. sun protection factor (सूर्य संरक्षण घटक) : SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. यामुळे तुमच्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते. या विशिष्ट प्राकारच्या सूर्यकिरणांमुळे त्वचेवर सनबर्न, टॅनिंग आणि स्किन कॅन्सर होण्याची शक्यता असते. दिवसभर उन्हात फिरल्यामुळे या किरणांमुळे तुमची त्वचा काळवंडू शकते.
सनस्क्रिन आणि त्याचा वापर :
सनस्क्रिनचा वापर करताना तुमच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर याचा वापर करताना 2.5 थेंब सनस्क्रिनचा वापर करावा. या थेंबाने ते तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि कव्हर करा. तर, तुमच्या शरीरातील दुसऱ्या भागावर म्हणजेच हातावर, पाठीवर, मानेवर यावरसुद्धा थोड्या प्रमाणात सनस्क्रिन तुम्ही लावू शकता.
सनस्क्रिनचा वापर कधी करावा?
नेहमीच सनस्क्रिन वापरताना एक गोष्ट लक्षात घ्या की, बाहेर जाण्याच्या अर्धा तास आधी सनस्क्रिन लावावी. कारण तुमच्या चेहऱ्यावर ते नीट मॉईश्चराईझ होण्यासाठी तितका वेळ लागतो. जर तुम्ही बाहेर खेळण्यासाठी किंवा व्यायाम काहीतरी अॅक्टिव्हिटी करण्यासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी एक सल्ला आहे की, प्रत्येकी दोन तासांनी तुम्ही सनस्क्रिन त्वचेवर लावावी. तसेच, तुम्ही स्विमिंग करताना किंवा तुम्हाला घाम आल्यावर तुम्ही सेम पद्धत वापरावी.
सनस्क्रिन कुठे लावावी?
आपल्यापैकी बरेच जण सनस्क्रिन फक्त चेहऱ्यावर लावतात. पण सनस्क्रिन तुमच्या संपूर्ण शरीरावर लावावी. तुमच्या त्वचेच्या संरक्षणासाठी. काही जागा ज्या आपण पूर्णपणे विसरतो. त्या म्हणजे, कान, नाक, ओठ, मानेच्या मागे, हात, पायांचे तळवे इ.
'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
1. सनस्क्रिन 100 टक्के संरक्षण देत नाहीत : कोणतेच सनस्क्रिन सूर्याच्या किरणांपासून तुमचा बचाव 100 टक्के करू शकत नाही. यासाठी तुम्ही स्वत:हून तुमची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी लांब हाताचे कपडे, फुल पॅन्ट, सनग्लासेस यांचा वापर करावा जेणेकरून सूर्याच्या किरणांमुळे तुमचे संरक्षण होईल.
2. जरी सूर्यप्रकाश पूर्णपणे नसला तरी 80 टक्के UV रेस कायम असतात. आणि तुमच्या त्वचेवर परिणाम करतात. अशावेळी तुम्ही कारमध्ये बसताना किंवा हिवाळ्यात तुम्ही सनस्क्रिनचा वापर करणे जास्त योग्य आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :