(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sabudana Benefits : रोज साबुदाणा खाल्ल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे; वाचा सविस्तर
Sabudana Benefits : साबुदाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे वजन वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी खूप चांगले मानले जाते.
Sabudana Benefits : स्वयंपाकघरातील पदार्थांमधला पांढराशुभ्र साबुदाणा अनेकांना आवडतो. साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. उपवासाच्या पदार्थांत विशेषकरून साबुदाण्याचा वापर केला जातो. हा साबुदाणा आरोग्याच्या दृष्टीनेही ते तितकाच फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकता. विशेषतः त्याची खिचडी आणि खीर तयार केली जाते. अनेकांना उपवासाच्या वेळी याचे सेवन करायला आवडते.
साबुदाण्याचे जर तुम्ही रोज सेवन केले तर तुम्ही अनेक समस्यांवर मात करू शकता. रोज साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. जाणून घेऊया साबुदाणा खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे आहेत?
शरीर सुडौल राहते : साबुदाणा खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात. जर तुमचे शरीर खूप दुबळे असेल तर तुमच्या आहारात साबुदाणा जरूर घ्या. यामुळे तुमचे शरीर फिट राहील.
हाडे मजबूत करण्यास मदत होते : रोज साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते जे हाडांची वाढ आणि मजबूती वाढवते. याशिवाय साबुदाणा हा देखील लोहाचा चांगला स्रोत आहे. हे ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांची वाढ देखील कमी करू शकते.
रक्तदाब नियंत्रित करते : उच्च रक्तदाबाच्या समस्येवर मात करायची असेल तर साबुदाणा खा. साबुदाणा हा फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम आणि फॉस्फरसचा एक चांगला स्रोत आहे जो रक्तदाब नियंत्रित करतो. यासोबतच शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रित करू शकते.
मेंदूला शक्ती मिळते : साबुदाणा खाल्ल्याने शारीरिक विकास तर होतोच, पण त्यामुळे मेंदूही सुधारतो. यामध्ये असलेले फोलेट मेंदूची दुरुस्ती करू शकते. यासोबतच मेंदूचे विकार दूर करण्यातही हे गुणकारी आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :