(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : शनिच्या त्रासातून वाचायचं असेल तर हे दहा उपाय नक्की करा, ‘या’ उपायांनी होणार बचाव
Shani Dev : शनिदेव आपल्या वर्तमानकाळातील आणि पूर्वजन्मीच्या कर्मानुसार फळ देतात. जर शनिदेवाच्या प्रकोपातून वाचायचे असेल तर काही अचूक उपाय करून त्याचा राग काही प्रमाणात कमी करता येतो.
Shani Dev : शनिदेवाची (Shani Dev) कृपा एखाद्या भक्ताला भिकाऱ्यापासून राजा बनवू शकते, परंतु जर शनिदेव कोणावर रागावले तर व्यक्तीचे प्रत्येक काम बिघडत असतात. ती व्यक्ती सहजासहजी सावरु शकत नाही. हा तुमचा परीक्षा काळ असतो त्यामुळे तुम्ही घबरून जाऊ नका. यालाच शनी महाराजांचा प्रकोपही (Shani Dev Prakop) म्हणता येईल. त्यांचा राग कसा ओळखावा आणि प्रकोप कसा टाळावा हे जाणून घ्या
शनिदेवाला न्यायाची देवता असे देखील म्हणतात. शनिदेव आपल्या वर्तमानकाळातील आणि पूर्वजन्मीच्या कर्मानुसार फळ देतात. जर शनिदेवाच्या प्रकोपातून वाचायचे असेल तर काही अचूक उपाय करून त्याचा राग काही प्रमाणात कमी करता येतो. शनिच्या साडेसाती (Shani Dev Sadesati) किंवा प्रकोपातून जात असाल कमी करण्यासाठी खालील उपाय करा.
शनिच्या साडेसाती किंवा प्रकोपातून जात असाल तर खालील उपाय करा.
- कधीही कोणाचीही फसवणूक करू नये, कोणाकडून पैसे जर उधारीवर घेतले असतील तर ते वेळेवर परत करा
- दिव्यांग व्यक्तींना कायम मदत करा, असे केल्याने तुमचे कर्म वाढते, ज्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.
- शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणाकडून काहीही फुकट घेऊ नका.
- तुमच्या घरी पाहुणे किंवा कोणीही व्यक्ती आल्यास पोटभर जेवूनच घरातून बाहेर पाठवावे.
- घरातील असो वा बाहेर, वृद्ध लोकांचा आदर करून त्यांना चांगली वागणूक दिल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
- शनिवारी 1.25 किलो काळी उडीद डाळ दान करा. सात धान्य दान करणे हा साडेसाती दूर करण्यासाठी चांगला उपाय आहे.
- काळे तीळ, मैदा आणि साखर एकत्र करून मुंग्यांना खाऊ घाला. कालवा, तलाव किंवा नदीतील माशांना पिठाच्या गोळ्या खायला द्या.
- शनिवारी जुने शूज आणि चप्पल कुणाला तरी दान करावे. तसेच या दिवशी कोणतेही नवीन काम किंवा प्रवास स करू नका.
- गरिबांना अन्नदान करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. याशिवाय जवळच्या मंदिरात भंडारा आयोजित केला जात असेल तर कोळसा दान करावा.
- काळ्या कुत्र्याला दूध किंवा भाकरी खायला द्या, असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. ज्यांना सती सतीचा त्रास होत असेल त्यांनी हा उपाय अवश्य करून पाहावा.
शनि दोष निवारण मंत्र
ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शन्योरभिस्त्रवन्तु न:।
ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:
मंत्र- ॐ ऐं ह्लीं श्रीशनैश्चराय नम:।
कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।
सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।