Shani Dev : 'या' 6 सवयी शनिदेवाला आवडत नाहीत, आताच सुधारा.. अन्यथा शनिदेव होतील नाराज, उपाय जाणून घ्या
Shani Dev : शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र 6 सवयी शनिदेवाला आवडत नाहीत, ज्यामुळे शनिदेव नाराज होतात, जाणून घ्या
Shani Dev : शनिदेवाला न्याय देवता म्हणून ओळखले जाते, जीवनातील वाईट आणि अडथळे दूर करण्यासाठी अनेक जण त्यांची प्रार्थना करतात. हिंदू पौराणिक कथेनुसार, सूर्यपुत्र शनिदेव, लोकांना त्यांच्या कृत्यांसाठी फळ किंवा शिक्षा देतात. असे मानले जाते की जे लोक शनिदेवांना प्रसन्न करतात त्यांच्या जीवनातील सर्व ध्येये साध्य होतात.
शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी करू नयेत?
हिंदू पौराणिक कथा सांगते की, शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी आयुष्यभर चांगले कर्म करावे लागतात. शनिदेवाला आपल्या पक्षात ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. एकीकडे काही उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात तर दुसरीकडे अशा काही कृती आहेत ज्यामुळे शनिदेव नाराज होतात. अशा स्थितीत शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेऊया.
चुकूनही हे करू नका
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचे स्नानगृह नेहमी अस्वच्छ असते, त्यांना शनीची शिक्षा भोगावी लागते. म्हणूनच बाथरूम वापरल्यानंतर ते अजिबात अस्वच्छ ठेवू नये.
वृद्ध, असहाय्य आणि ज्येष्ठांचा अनादर केल्यामुळे शनिदेव कोपतात. यापैकी कोणत्याही व्यक्तीचा अपमान केल्याने शनिदेवाच्या क्रूर नजरेला सामोरे जावे लागते.
जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील आणि ते मुद्दाम परत करत नसाल तर तुम्हाला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो.
अशा लोकांच्या जीवनात शनि अनेक समस्या निर्माण करतो. त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते लवकरात लवकर फेडावे.
एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे निर्माण करणाऱ्या लोकांवरही शनिदेवांचा कोप राहतो. त्यामुळे अनेकदा त्यांचे पूर्ण झालेले काम बिघडते आणि याशिवाय त्यांना आर्थिक कोंडीलाही सामोरे जावे लागते.
ज्या लोकांना बसताना पाय हलवण्याची सवय असते त्यांनाही शनिदेवाच्या नाराजीचा सामना करावा लागतो. विनाकारण पाय हलवण्याची ही सवय खूप वाईट मानली जाते, यामुळे माणसाच्या आयुष्यात तणाव वाढतो.
तुम्हाला स्वयंपाकघरात न वापरलेली भांडी तशीच सोडायची सवय असेल तर ती लगेच दुरुस्त करा.
ज्योतिषशास्त्रामध्ये याला अशुभ मानले जाते आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते. स्वयंपाकघरात ठेवलेल्या खरकट्या भांड्यांमुळे शनिदेव कोपतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : शनिदेव केवळ घाबरवतच नाहीत, तर 'या' 5 लोकांनाही घाबरतात, काय आहे रहस्य? जाणून घ्या