(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : तुमच्या जन्मपत्रिकेत शनि त्रास देत असेल, तर 24 डिसेंबर हा विशेष दिवस, त्याचा 'असा' फायदा घ्या.
Shani Dev : शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. मात्र शनि अशुभ असेल तर काय करावे? जाणून घ्या
Shani Dev : शनिदेवाच्या कृपेचे जीवनात विशेष महत्त्व आहे, ज्योतिषशास्त्रात कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून शनिचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. सन 2024 मध्ये काही राशींसाठी शनि खूप फायदेशीर असणार आहे. शनि हा एक कठोर आणि निर्णयक्षम ग्रह मानला जातो. कर्म घराचा स्वामी शनि आहे, त्यामुळे शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. मात्र शनि अशुभ असेल तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील हा दिवस विशेष असेल, जाणून घ्या सविस्तर
शनि अशुभ असेल तर...
शनि अशुभ असेल तर शनि प्रदोष व्रताचे व्रत आणि पूजा करणे फायदेशीर आहे, 24 डिसेंबर हा विशेष दिवस आहे. या दिवशी प्रदोष व्रत केले जाईल. हे वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत असेल. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. प्रदोष काळातच या दिवशी पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळेल
24 डिसेंबरला येणारा प्रदोष व्रत हा 2023 सालचा शेवटचा प्रदोष व्रत असेल. मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे प्रदोष व्रत यावेळी रविवारी असल्याने या व्रताला रवि प्रदोष व्रत म्हटले जाईल. जे लोक शनीची साडेसाती आणि शनीची ढैय्या यांच्या प्रभावाखाली आहेत, त्यांनी रवि प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यास त्यांना शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते.
जीवनात प्रगतीचा मार्ग मिळेल
मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आहे, वृश्चिक आणि कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची ढैय्या चालू आहे, या दिवशी शिवलिंगावर अवश्य जल अर्पण करा. तसेच लिंगस्तकम् स्तोत्राचे पठण करावे. या दिवशी शिव स्तुती पठण केल्याने शनिदेव तसेच राहू आणि केतू यांच्या प्रकोप आणि अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. तसेच, व्यक्ती जीवनात प्रगतीच्या मार्गावर पुढे जाते.
शनि अनेक राशींना विशेष लाभ देणार
ज्योतिषशास्त्रानुसार, 2024 मध्ये अनेक राशींवर शनि कृपा करणार आहे. 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनि कुंभ राशीत वक्री राहील. 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 या कालावधीत शनिचा अस्त होईल, तर 18 मार्च 2024 रोजी शनिचा उदय होईल. या लोकांना शनि अनेक राशींना विशेष लाभ देणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: