Pitru Paksha 2023 : आजपासून पितृपक्षाला सुरूवात, पितरांचे श्राद्ध करताना 'या' मंत्राचा जप अवश्य करा, जाणून घ्या
Pitru Paksha 2023 : पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या वेळी तुमच्या पितरांचे श्राद्ध करताना काही मंत्रांचा अवश्य जप करावा, जाणून घ्या
Pitru Paksha 2023 : पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 पासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे, तो 14 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल. पितृ पक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि 15 दिवसांनी अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतो. धार्मिक मान्यतेनुसार, या वेळी तुमच्या पितरांचे श्राद्ध करताना काही मंत्रांचा अवश्य जप करावा, यामुळे पितरांना सहज अन्नपाणी ग्रहण करता येईल
पूर्वजांच्या आत्म्यांना पृथ्वीवर येण्याची संधी
धार्मिक मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात, परलोकात गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्यांना पृथ्वीवरील आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळते. तसेच ते पिंडदान, अन्न आणि पाणी अर्पण करण्याच्या इच्छेने आपल्या मुलांसोबत राहतात. असे म्हणतात, श्राद्ध पक्षात मिळणारे अन्न आणि पाणी त्यांना शक्ती देते ज्यामुळे ते परलोकात जातात.
पितरांना प्रसन्न करणारा मंत्र
श्राद्धाच्या वेळी पितरांसाठी तर्पण आणि पिंड दान करताना या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करून पितरांना आवाहन केले जाते. असे मानले जाते की, यामुळे ते आपल्या कुटुंबात येऊन श्राद्ध ग्रहण करू शकतात. गंगाजलात दूध, तीळ आणि जव मिसळून ठेवा, यानंतर अंजलीत पाणी घेऊन पितरांना तीन-पाच वेळा जलांजली अर्पण करा.
ॐ पितृ देवतायै नम:
‘ओम आगच्छन्तु में पितर एवं ग्रहन्तु जलान्जलिम’
आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण मंत्र
जलंजली देताना आपल्या गोत्राचे नाव घ्या आणि म्हणा - गोत्र अस्मन्माता (आईचे नाव) देवी वसुरुपास्त् तृप्यतमिदं तिलोदकम गंगा जल वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः.
पित्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण मंत्र
आपल्या वडिलांना तर्पण करण्यापूर्वी, आपल्या गोत्राचे नाव घ्या आणि गोत्र अस्मात्पिता (पित्याचे नाव) वसुरूपत् तृप्यतामिदं तिलोदकं गंगा जलं वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः म्हणा.
आजी आणि आजोबांच्या शांतीसाठी तर्पण मंत्र
आजोबा - तुमच्या गोत्राचे नाव घेऊन, तीन "गोत्रे अस्मात्पितामह (आजोबांचे नाव) वसुरूपात तृप्यतामिदं तिलोदकम गंगा जलं वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः" वर जलंजली अर्पण करा.
आजी - तुमच्या गोत्राचे नाव घेणे “गोत्रे अस्मात्पितमह (आजीचे नाव) वसुरूपात तृप्यतामिदं तिलोदकम गंगा जलं वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः 16 वेळा पूर्व दिशेला, 7 वेळा उत्तर दिशेला आणि 14 वेळा दक्षिण दिशेला जलांजली अर्पण करावी.
पितृ गायत्री मंत्र
जर तुम्हाला श्राद्धातील इतर मंत्रांचे पठण करता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या पितरांच्या मोक्षासाठी पितृ गायत्री पाठाचेही पठण करू शकता. याशिवाय पितृ गायत्री मंत्राचे पठण केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती मिळते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात.
ॐ देवताभ्य: पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च। नम: स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नम:।
ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्।
ॐ आद्य-भूताय विद्महे सर्व-सेव्याय धीमहि। शिव-शक्ति-स्वरूपेण पितृ-देव प्रचोदयात्।
पितृदोष दूर करण्यासाठी पितृ कवच
कृणुष्व पाजः प्रसितिम् न पृथ्वीम् याही राजेव अमवान् इभेन।
तृष्वीम् अनु प्रसितिम् द्रूणानो अस्ता असि विध्य रक्षसः तपिष्ठैः॥
तव भ्रमासऽ आशुया पतन्त्यनु स्पृश धृषता शोशुचानः।
तपूंष्यग्ने जुह्वा पतंगान् सन्दितो विसृज विष्व-गुल्काः॥
प्रति स्पशो विसृज तूर्णितमो भवा पायु-र्विशोऽ अस्या अदब्धः।
यो ना दूरेऽ अघशंसो योऽ अन्त्यग्ने माकिष्टे व्यथिरा दधर्षीत्॥
उदग्ने तिष्ठ प्रत्या-तनुष्व न्यमित्रान् ऽओषतात् तिग्महेते।
यो नोऽ अरातिम् समिधान चक्रे नीचा तं धक्ष्यत सं न शुष्कम्॥
ऊर्ध्वो भव प्रति विध्याधि अस्मत् आविः कृणुष्व दैव्यान्यग्ने।
अव स्थिरा तनुहि यातु-जूनाम् जामिम् अजामिम् प्रमृणीहि शत्रून्।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दाढी, मिशा, नखं आणि केस कापावेत की नाही? शास्त्रानुसार काय आहेत नियम? जाणून घ्या