Navratri 6th Day : वैवाहिक जीवनात सुख-शांतीचा आशीर्वाद देणारी देवी कात्यायनी! नवरात्रीच्या 6 व्या दिवशी 'अशी' पूजा करा, जाणून घ्या
Navratri 6th Day : शारदीय नवरात्रीचा 6 वा दिवस शत्रूंवर विजयाचे वरदान देणाऱ्या कात्यायनी देवीला समर्पित आहे. देवी कात्यायनीची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, नैवेद्य आणि मंत्र जाणून घ्या
Navratri 6th Day : आज शारदीय नवरात्रीची सहावी माळ आहे. आज 20 ऑक्टोबर 2023 रोजी कात्यायनी देवीची (Goddess Katyayani) पूजा केली जाईल. देवी कात्यायनी, देवी दुर्गेची सहावी शक्ती, महर्षी कात्यायनाच्या घरी जन्मली, म्हणून तिचे नाव कात्यायनी पडले. अविवाहितांचा लवकर विवाह आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती यांसाठी कात्यायनी मातेची उपासना अचाट मानली जाते.
कात्यायनी देवीच्या कृपेने मिळतो मनासारखा जोडीदार
कात्यायनी माता ही ब्रजमंडळाची प्रमुख देवता आहे. त्यांच्या आशीर्वादाने भक्ताला मनासारखा जोडीदार मिळतो. अशी धारणा आहे. शारदीय नवरात्रीच्या 6 व्या दिवशी देवी कात्यायनीच्या पूजेची पद्धत, तिचा आवडता नैवेद्य, रंग आणि मंत्र जाणून घ्या.
शुभ मुहूर्त
शारदीय नवरात्रीच्या दिवशी कात्यायनी देवीच्या उपासनेसाठी सूर्यास्ताचा काळ शुभ मानला जातो. या काळात देवीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
सकाळची वेळ - 06.25 am - 10.40 am
संध्याकाळची वेळ - 04.22 pm - 05.47 pm
कृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते व्रत
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाईल. या दिवसापासून दुर्गापूजेला सुरुवात होणार आहे. कात्यायनी मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक उपवासही करतात. मां कात्यायनी व्रताशी संबंधित अशी श्रद्धा आहे की कृष्णाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत प्रथम भीरभूमीच्या गोपीकानी केले होते
देवी कात्यायनीच्या पूजेची पद्धत
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सर्वप्रथम हातात फूल घेऊन कात्यायनी देवीचे ध्यान करा.
यानंतर देवी कात्यायनीची पंचोपचार पूजा करून तिला लाल फुले, अक्षता, कुंकू आणि सिंदूर अर्पण करा.
यानंतर त्यांच्यासमोर तूप किंवा कापूर जाळून आरती करावी.
शेवटी देवीच्या मंत्रांचा जप करावा.
कात्यायनी देवीच्या पूजेमध्ये पांढरा किंवा पिवळा रंगही वापरता येतो.
देवी कात्यायनी शुक्र ग्रहावर नियंत्रण ठेवते.
शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी कात्यायनी देवीचीही पूजा केली जाते,
ती स्वतः नकारात्मक शक्तींचा नाश करणारी देवी आहे.
देवी कात्यायनीचा नैवेद्य
कात्यायनी मातेच्या पूजेत मध अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे सौंदर्य वाढते. वैवाहिक जीवनात मधुरता येते आणि धनाचा लाभ होतो.
देवी कात्यायनी मंत्र
या देवी सर्वभूतेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
ॐ ह्रीं कात्यायन्यै स्वाहा, ह्रीं श्रीं कात्यायन्यै स्वाहा ॥
क्लीं श्री त्रिनेत्रायै नम:।
कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि । नन्द गोपसुतं देविपतिं मे कुरु ते नमः ॥
चंद्र हासोज्ज वलकरा शार्दू लवर वाहना कात्यायनी शुभं दद्या देवी दानव घातिनि
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :