Hartalika 2023 : हरतालिकाचा अर्थ काय? हे नाव कसे पडले? महत्त्व जाणून घ्या
Hartalika 2023 :पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान भगवान शंकराची प्राप्ती करण्यासाठी हे व्रत केले होते.
Hartalika 2023 : हरतालिकेचा दिवस खास करून महिलांकडून साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. हरतालिका यंदा 18 सप्टेंबर 2023 म्हणजे आज साजरा केली जात आहे. हरतालिका तृतीयेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास करतात. पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान भगवान शंकराची प्राप्ती करण्यासाठी हे व्रत केले होते.
पार्वती आणि शिवाच्या मिलनाला समर्पित दिवस
हरतालिका हा सण प्रामुख्याने पार्वती आणि शिवाच्या मिलनाला समर्पित आहे. या दिवशी स्त्रिया पार्वती आणि शिव यांची पूजा करतात, तसेच निर्जळी व्रत करतात. या दिवशी रात्रभर जागरण करत भजन आणि कीर्तन करण्याची पद्धत आहे. हरतालिकेच्या दिवशी महिला दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवास सोडतात.
हरतालिका हा संस्कृत शब्द, याचा अर्थ काय?
हरतालिका हा संस्कृत शब्द आहे. या शब्दात हरित आणि अलिका यांचे संयोजन आहे. हर म्हणजे हरण करणे, घेऊन जाणे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी.
तेव्हापासून हा दिवस हरतालिका तृतीया ओळखला जातो
हरतालिका कथेनुसार, पार्वतीने शैलपुत्रीचा अवतार घेतला. पार्वती लहान असताना तिचे शिवाशी लग्न करण्याविषयी वडिलांना सांगितले, पण ते तयार झाले नाहीत. अशा स्थितीत पार्वतीच्या मैत्रिणींनी पार्वतीला एका गुहेत अपहरण करून नेले. जेथे भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी पार्वतीने गंगा नदीची वाळू आणि मातीपासून शिवलिंग बनवून तपश्चर्या सुरू केली. यामुळे भगवान शिव इतके प्रसन्न झाले की, त्यांनी पार्वतीशी लग्न करण्याचे वचन दिले. अखेर, पार्वती शिवाशी एकरूप झाली आणि त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने त्यांचा विवाह झाला. तेव्हापासून हा दिवस हरतालिका तृतीया म्हणून ओळखला जातो.
हरतालिका 'या' भागात साजरी केली जाते
हरतालिका तृतीया नेपाळच्या टेकडी प्रदेशात, उत्तर भारताच्या बहुतांश भागात जसे की बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम आणि राजस्थानमध्ये साजरी केली जाते.
हरितालिका शुभ मुहूर्त
हरतालिका तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विधी, नियमानुसार पूजा केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होते. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तृतीया साजरी केली जाते. पंचागानुसार, तृतीया तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पर्यंत असेल. परंतु हे व्रत (Vrat) सोमवारी 18 सप्टेंबरला केले जाईल. सकाळी 6 ते रात्री 8.24 पर्यंत पूजेसाठी योग्य वेळ आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या
Hartalika 2023 : विवाहित, अविवाहित स्त्रियांसाठी महत्त्वाचे व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योगबद्दल