Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला खास बनतात 'हे' पाच पदार्थ, लाडक्या बाप्पाला भाविक करतात खूश!
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीसाठी खास पद्धतीने पाच पदार्थ बनवू शकता. यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
Ganesh Chaturthi 2023 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) मोठ्या थाटामाटात सुरू होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी होणार असून, त्याची बाजारपेठा, सार्वजनिक मंडळं आणि घरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. दहा दिवसांचा गणेश उत्सव गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. या उत्सवात विविध प्रकारचे पदार्थ बनवून गणपतीला अर्पण केले जातात. अशात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीसाठी खास पद्धतीने पाच पदार्थ बनवू शकता. यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे बाप्पाला खूप प्रिय आहेत.
पुरणपोळी
पौराणिक मान्यतेनुसार, गणपती बाप्पाला गोड पदार्थ खूप आवडतात. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे, पूरणपोळी ही गोड असल्याने ती तयार करून बाप्पाला तुम्ही अर्पण करू शकता. ही एक खास प्रकारची गोड पोळी आहे, ज्याची चव अप्रतिम आहे.
खजूर लाडू
तुम्ही घरच्या घरी खजुराचे लाडू बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आहेत आणि खूप आरोग्यदायी आहेत. तुम्ही ते एक दिवस अगोदर तयार करून बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता.
मालपुआ
सणासुदीच्या काळात मालपुआ चवीला स्वादिष्ट लागतो. आपण गणपती स्थापनेच्या दिवशी बाप्पाला अर्पण करू शकता.
केशर श्रीखंड
सणासुदीच्या काळात श्रीखंड चविष्ट लागते. हे दही आणि साखरेच्या मदतीने बनवले जाते. केशर श्रीखंड बनवून तुम्ही लोकांची तसेच बाप्पाची मने जिंकू शकता.
खसखस खीर
अनेक ठिकाणी गणपतीला खसखसची खीर अर्पण करण्याची परंपरा आहे. तुम्ही घरी सहज बनवू शकता.
गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि मोठमोठ्या पूजा मंडपात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना शुभ मुहूर्तावर करतात. चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 02:09 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3:13 वाजता समाप्त होईल. 19 सप्टेंबर रोजी उदय तिथीवर आधारित गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. गणेश मूर्तीच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11:07 ते दुपारी 01:34 पर्यंत आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या
Ganeshotsav 2023: 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिर; यंदा गणेश चतुर्थीनिमित्त देऊ शकता भेट