(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhaum Pradosh Vrat 2024 : आज भौम प्रदोष! कर्जमुक्ती, मांगलिक दोष, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील, फक्त 'या' 3 गोष्टी करा
Bhaum Pradosh Vrat 2024 : आज भौम प्रदोष आणि मासिक शिवरात्री व्रत आहे. या दिवशी भौम प्रदोष व्रताचा योगायोग आहे, उपाय जाणून घ्या
Bhaum Pradosh Vrat 2024 : आज 9 जानेवारीला प्रदोष आणि मासिक शिवरात्री व्रत आहे. या दिवशी भौम प्रदोष व्रताचा योगायोग आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, मांगलिक दोष दूर करण्यासाठी विशेष उपाय करावे लागतील. जाणून घ्या सविस्तर..
प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा योगायोग!
2024 या वर्षातील पहिला प्रदोष व्रत 9 जानेवारी 2024 रोजी आहे. हा दिवस मासिक शिवरात्रीलाही येतो. अशा स्थितीत भगवान शंकराची आराधना केल्याने उपवास करणाऱ्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते. या व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे दु:ख, रोग, वेदना, क्लेश इत्यादी दूर होतात. पौष आणि जानेवारीचे पहिले प्रदोष व्रत हे भौम प्रदोष व्रत असेल. मांगलिक दोषापासून मुक्ती, कौटुंबिक आनंद, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर आणि कर्जमुक्तीसाठी भौम प्रदोष व्रताच्या दिवशी काही खास उपाय करा. ज्योतिषी अनिश व्यास जी यांच्याकडून प्रदोष व्रताचे उपाय जाणून घ्या.
भौम प्रदोष उपाय
मांगलिक दोषसाठी...
मंगळवारी त्रयोदशी तिथी असल्यामुळे याला भौम प्रदोष व्रत म्हणतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत किंवा त्यांचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहे, त्यांनी या दिवशी मंगलदेवाच्या 21 नामांचा जप करावा, असे मानले जाते की यामुळे मांगलिक दोष शांत होईल. लग्नाची इच्छा पूर्ण होते.
भगवान शिव-हनुमान संकट करतील दूर
हनुमानजी हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात, म्हणून असे मानले जाते की भौम प्रदोष व्रत केल्याने हनुमानजी देखील प्रसन्न होतात. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी ओम भीम हनुमते, श्री राम दूताय नमः या मंत्राचा जप करा.
वैवाहिक जीवनात मधुरता
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी रेशमी वस्त्रांनी भगवान शिवासाठी मंडप बनवा. यानंतर पीठ आणि हळद घालून स्वस्तिक बनवा. शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून बेलपत्र, भांग, धतुरा, पांढरे फूल, पंचगव्याने पूजा करावी. असे म्हणतात की यामुळे पती-पत्नीमधील अंतर संपते. विचार पटतात आणि प्रेम वाढते.
कर्जापासून मुक्ती
ज्योतिषाच्या मते, भौम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर केशरमिश्रित जल अर्पण करून शिव चालीसा 11 वेळा आणि नंतर हनुमान चालीसा 11 वेळा पाठ केल्यास कर्ज मुक्ती मिळते.
भौम प्रदोष व्रत 2024 मुहूर्त
पंचांगानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 8 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:58 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 9 जानेवारी 2024 रोजी रात्री 10:24 वाजता समाप्त होईल.
शिवपूजा मुहूर्त - 05.41 सायं - रात्री 08.24
कालावधी - 02.43
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Vivah Muhurta 2024 : विवाहासाठी सर्वोत्तम मुहूर्त फेब्रुवारी 2024 मध्ये! मे, जून मध्ये मुहूर्त नाहीत? तुमच्याकडेही यंदा कर्तव्य असेल तर एकदा पाहाच...