Relationship Tips : जो इतरांचं ऐकून जोडीदाराशी लबाडी करतो, अशा जोडीदाराला कसं ओळखाल? 'अशा' प्रकारे तुमचा वापर करतात.
Relationship Tips : एक चांगला आणि समजूतदार जोडीदार तुमचं आयुष्य अगदी सोपं बनवू शकतो, परंतु एखादा लबाड, चलाख जोडीदार नातेसंबंधात तणाव आणू शकतो. अशा लोकांची काही खास ओळख असते.
Relationship Tips : असं म्हणतात ना, समजून घेणारा, मनापासून प्रेम करणारा, काळजी करणारा जोडीदार मिळायला भाग्य लागतं... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारा जोडीदार मिळाला की संसाराची गाडी कशी प्रगतीच्या वाटेवर धावते. एक चांगला आणि समजूतदार जोडीदार तुमचं आयुष्य अगदी सोपं बनवू शकतो, परंतु एखादा लबाड, चलाख जोडीदार नातेसंबंधात तणाव आणू शकतो. अशा लोकांची काही खास ओळख असते, ज्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून नात्यात दररोज होणाऱ्या भांडणांपासून दूर राहू शकता.
अशा लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहणे हे एक आव्हान
मॅनिपुलेशन हा इंग्रजीतील शब्द तुम्ही ऐकला असेल ना? याचा अर्थ तुमची कामं करून घेण्यासाठी इतर लोकांशी हातमिळवणी करणे किंवा तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून तुमच्याकडून सर्वकाही मिळवणे. अशा लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहणे हे एक आव्हान असते. कारण ते तुमच्याबद्दल कमी आणि स्वतःबद्दल जास्त विचार करतात, जर नातं नीट ठेवायचं असेल तर दोन्ही बाजूंनी पाठिंबा आवश्यक असतो. जर तुमचा जोडीदारही नातं दीर्घकाळ टिकवणं ओझं समजत असेल. तर आजच्या लेखात आपण हेराफेरी करणारा जोडीदार कसा ओळखायचा हे जाणून घेणार आहोत.
मॅनिपुलेटिव्ह जोडीदार कसा ओळखाल?
-मॅनिपुलेटिव्ह जोडीदार त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमत होण्यासाठी तुम्हाला भावनिकरित्या ब्लॅकमेल करत राहतात. स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या भावनांशी खेळण्यात त्यांना अजिबात वाईट वाटत नाही. कोणत्याही मार्गाने आपला मुद्दा मांडणे हा त्यांचा उद्देश असतो.
-लबाड व्यक्तींना नातेसंबंधात जोडीदाराचा हस्तक्षेप आवडत नाही. ते त्यांच्या नात्याबाबत कोणाचीही सूचना सहन करत नाहीत, आपल्या जोडीदाराला मित्र आणि नातेवाईकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना त्यांच्याभोवती त्यांचे जग निर्माण करायचे आहे.
-लबाड जोडीदार स्वतः चुकीचे करतात, परंतु ते त्यांच्या कृती आणि शब्दांद्वारे तुम्हाला दोष देण्याचा प्रयत्न करतात. काही काळानंतर, आपण प्रत्येक गोष्टीसाठी स्वत: ला जबाबदार समजू लागतो. आयुष्य आनंदाने नाही तर तणावाने भरलेले आहे, असे वाटू लागते
-लबाड जोडीदार त्यांच्या इच्छेनुसार तुमच्याशी बोलतील आणि त्यांच्या इच्छेनुसार तुमचे संभाषण थांबवतील. तुमच्या भावनांना त्यांच्यासाठी किंमत नाही. ते तुम्हाला इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात.
-एकप्रकारे असे लोक तुम्हाला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवायला लावतात. रिलेशनशिपमध्ये असताना दोघांचे निर्णय महत्त्वाचे असतात, असे लोक स्वतःचे निर्णय सर्वोपरि ठेवतात.
हेही वाचा>>>
Relationship Tips : क्वालिटी टाईम... भावना समजणे...अन् 'या' सवयी नात्यात आणतात गोडवा! जोडीदार अक्षरश: भाळेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )