एक्स्प्लोर

Relationship Tips : 'काही' गोष्टींना 'नाही' म्हणायलाही शिका! असं केलंत तर निभावेल' अन्यथा तुमचा चांगुलपणाच ठरेल नुकसानाचं कारण

Relationship Tips : असं म्हणतात की, खूप चांगलं असणं हे स्वतःच्या नुकसानाचं कारण बनतं. 'नाही' न बोलण्याची तुमची सवयही यापैकीच एक आहे. 

Relationship Tips : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. पण काही लोक स्वभावाने इतकी चांगली असतात की त्यांचा गैरफायदा घेतला जातो. हे सुद्धा त्यांना कळत नाही, असे अनेक लोक आहेत. ज्यांना त्यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात कुठल्याही गोष्टीला 'नाही' बोलायला आवडत नाही. तसेच कोणाला 'नाही' म्हणण्याची हिंमतही त्यांची होत नाही. पण त्यांच्या या सवयीमुळे काही वेळेस लोक केवळ स्वतःचेच नुकसान करून घेतात, तसेच त्यांचा तणावही वाढवून घेतात. म्हणून, मित्र-मैत्रिणींनो आपल्या आनंदासाठी आणि मजबूत नातेसंबंधासाठी, आपण काही प्रसंगी स्पष्ट नकारही दिला पाहिजे.


खूप चांगलं असणं हे स्वतःच्या नुकसानाचं कारण बनतं!

मला कोणालाही 'नाही' बोलायला होत नाही, मला कोणाला 'नाही' म्हणायला त्रास होतो. ही परिस्थिती अनेक लोकांबाबत दिसून येते. या स्वभावाच्या लोकांना त्यांनी 'नाही' म्हटल्याने एखादा गुन्हा केला आहे, असे वाटते.  असं म्हणतात ना.. की खूप चांगलं असणं हे स्वतःच्या नुकसानाचं कारण बनतं. 'नाही' न बोलण्याची तुमची सवयही यापैकीच एक आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 'नाही' कधी म्हणायचे हे समजून घेतले पाहिजे. कारण काही प्रसंगी 'हो' म्हणणे ही सर्वात मोठी चूक ठरते. अशा परिस्थितीत या संधी समजून घ्या आणि 'नाही' म्हणायला शिका. आज आम्ही तुम्हाला कधी, कुठे आणि कसे 'नाही' म्हणायचे ते सांगत आहोत. जेणेकरून तुम्ही स्पष्ट राहाल, आणि कोणत्याही तणावापासून दूर राहाल


स्वाभिमानाशी तडजोड मुळीच करू नका 

कोणतेही काम करताना जर तुम्ही तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड करत असाल तर तुम्ही हे काम पूर्णपणे नाकारले पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान त्याच्यासाठी सर्व काही आहे. त्यामुळे स्वाभिमान लक्षात घेऊन बोलायचेच असेल तर न डगमगता बोलावे.


असे काम स्वीकारू नका

लक्षात ठेवा की मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमता मर्यादित आहेत. सगळ्यांना खूश करण्याच्या प्रयत्नात तुम्ही या मर्यादा ओलांडल्यास आणि 'होय' म्हणाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर तसेच मानसिकतेवर होऊ शकतो. यामुळे तणाव, जळजळ आणि आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे, ज्या कामात तुम्हाला तणाव वाटत असेल ते काम नाकारणे शहाणपणाचे ठरेल.


भीती किंवा धमकीला घाबरू लका

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटतील जे प्रत्येक संभाषणात आपला अधिकार व्यक्त करताना म्हणतात की 'मला 'नाही' ऐकायची सवय नाही. अशा लोकांच्या इच्छा पूर्ण करताना काही लोक 'नाही' म्हणण्याची कलाही विसरतात. मग यावेळी भीती किंवा धोका वाटू लागतो. म्हणून जेव्हा तुम्हाला ते वाटत नाही तेव्हा नाही म्हणा. नाही म्हणण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व सरळ पुढे करणे, जेणेकरून तुम्हाला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही.


जेव्हा विश्वास डगमगतो

अनेक वेळा असे घडते की आपल्या प्रियजनांच्या बोलण्याने आपल्यावर प्रभाव पडतो, आपण त्या कामांना हो म्हणतो, ज्यावर आपला स्वतःचा विश्वास नाही. परंतु यामुळे, ते त्यांचे सुख आणि नातेसंबंध वाचवू शकत नाहीत, उलट त्यांना विनाशाकडे घेऊन जातात. त्यामुळे जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत 'हो' म्हणण्याची चूक करू नका.


जेव्हा नातेसंबंध खराब होतात

वैयक्तिक जीवन असो किंवा व्यावसायिक, जेव्हा नातेसंबंध विषारी होऊ लागतात तेव्हा नाही म्हणणे महत्त्वाचे असते. नात्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्यापासून अंतर राखणे केव्हाही चांगले. समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या सर्व गोष्टी मनापासून पाळायच्या असतील तर तुम्ही नाही म्हणावे. यामुळे तुम्ही काही काळ दु:खी व्हाल, पण रोजच्या तणावातून तुमची सुटका होईल.


वेळेचा आदर करा..

मागची वेळ कधीच परत येत नाही, म्हणून वेळेचा आदर केला पाहिजे. तुमच्याकडे वेळ नसेल तर दुसऱ्याच्या कामाला 'नाही' म्हणण्यात काही गैर नाही. अशा स्थितीत तुम्ही नाही म्हटले नाही तर तुमचे काम वेळेवर पूर्ण करता येत नाही. मग तुमचे थेट नुकसान होते आणि आयुष्यात इतरांपेक्षा मागे राहण्याची शक्यता वाढते. म्हणून, यशस्वी होण्यासाठी, आवश्यकतेला 'नाही' म्हणा.


नाही म्हणणे ही एक कला..

वैयक्तिक-व्यावसायिक आणि निरोगी नातेसंबंधांसाठी 'नाही' म्हणण्याची कला प्रत्येकाला अवगत असावी. जी कोणतीही व्यक्ती सरावाने स्वतःमध्ये विकसित करू शकते. ही कला विकसित झाली की माणसाला त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतात. जगाला सुखावण्याचे दडपण त्याच्या मनातून दूर होते. मग तो त्याच्या इच्छेनुसार, स्वभावानुसार आणि गरजेनुसार निर्णय घेतो. नाही म्हणायला अजिबात संकोच करू नका, जेव्हा वेळ येईल तेव्हा प्रेमाने नकार समजावून सांगा. नकार देण्याचे धैर्य वाढवा आणि नंतर आपल्या निर्णयावर ठाम राहा.

 

 

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. 

हेही वाचा>>>

Relationship Tips : 'असला जोडीदार नको गं बाई!' तुमच्यासाठी योग्य जोडीदार कसा ओळखाल? लग्नानंतर सुखी आयुष्य हवंय? हे संकेत जाणून घ्या, 

 

 

 

 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget