(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Relationship Tips : दुसऱ्यांबद्दल 'गॉसिप' करणे तुमच्यासाठी पडू शकते भारी! 3 लक्षणं जाणून घ्या, तुमची प्रतिमा होऊ शकते खराब
Relationship Tips : बरेच लोक इतरांबद्दल गॉसिप करण्यात आणि ऐकण्यात आनंद घेतात. अनेक बाबतीत याला रागाचे स्वरूप येते. परंतु असे करणे तुमच्यासाठी भारी पडू शकते
Relationship Tips : आजकाल एकमेकांबद्दल बोलणं म्हणजेच गॉसिप करणं ही सामान्य बाब झालीय. बऱ्याच लोकांना गॉसिप करायला आवडते. आता मित्रांमधली गॉसिप असो, शेजाऱ्यांमधली गॉसिप असो किंवा बेस्ट फ्रेंडसोबत गॉसिप असो. गॉसिप टाळणे जवळजवळ अशक्य आहे. अनेक वेळा रागाच्या भरात लोक इतरांबद्दल गप्पा बोलू लागतात,ज्यामुळे तुमच्या नात्याला हानी पोहोचते. रिलेशनशिप थेरपिस्ट नाइला वॉरेन यांनी एका मुलाखतीदरम्यान याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या जाणून घ्या..
सावधान! तुम्ही तुमची प्रतिमा खराब करत आहात.
रिलेशनशिप थेरपिस्ट नाइला वॉरेन यांनी सांगितले की, गॉसिपमध्ये एखाद्या बद्दल काही गोष्टी अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने मांडल्या जातात. बऱ्याच वेळा लोक अफवा पसरवण्याच्या उद्देशाने गप्पा मारतात आणि गप्पांमध्ये सामील होतात. पण कधी कधी असंही घडतं की तुम्ही ज्याच्याबद्दल गॉसिप करत आहात ती व्यक्ती दु:खी होते. तुमच्या भावना व्यक्त करणे किंवा तुमचा राग काढणे ठीक आहे, पण तुम्ही जर इतरांबाबत गॉसिप केले तर तुम्ही इतरांचे नुकसानच करत नाही तर, तुमची प्रतिमा देखील खराब करत आहात.जाणून घेऊया राग काढणे आणि गॉसिपिंग यात काय फरक आहे.
एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगणे..
वॉरन सांगतात की, जर कोणी मीठ मसाला लावून एखादी गोष्ट सांगितली तर प्रत्येकजण ते ऐकण्यात रस दाखवतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते तिसऱ्या व्यक्तीलाही सांगतात. वास्तविक,जेव्हा कोणी दुसऱ्याच्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगतो, तेव्हा ती गॉसिप असते. तुम्ही बोलत असताना त्या व्यक्तीचे नाव आणि ओळख सांगत असाल तर तसे करणे टाळा.
राग काढणे
वॉरन सांगतात की, तुमच्या मनात अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कोणाशी तरी शेअर करायच्या आहेत.कालांतराने तुम्ही कोणाला काही सांगितले नाही, तर तुमचा राग वाढतो आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या गोष्टी कोणाला सांगितल्या तर त्याला राग काढणे म्हणतात. उदाहरणार्थ, समजा तुमचे कोणाशी भांडण झाले आणि तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्या भूतकाळाबद्दल सांगितले तर तुमच्या भावना संतप्त किंवा दुःखी असू शकतात.जेव्हा तुम्ही या गोष्टी तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगाल तेव्हा तो तुमचे म्हणणे ऐकेल आणि योग्य सल्लाही देईल.
दुसऱ्याचे मत बदलण्याचा प्रयत्न
जेव्हा एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे मत बदलण्याचा प्रयत्न करते,याचा अर्थ तुम्ही गॉसिप करत आहात.आपला मित्र एखाद्या समस्येबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपल्यापेक्षा भिन्न मत देतो तेव्हा समजून जा.आता या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या मित्राचे म्हणणे बदलण्याचा प्रयत्न केलात किंवा त्याला तुमचा दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी राजी केले तर त्याला गॉसिप म्हणता येईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>
Health : अवघ्या काही मिनिटांत तुमचा तणाव दूर होईल,फक्त ही 3 योगासने करा, फ्रेश वाटेल!