Relationship Tips : नातं टिकवण्यासाठी 'ब्रेक' ही आवश्यक, इथे ब्रेकचा अर्थ समजून घ्या, 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या
Relationship Tips : नातेसंबंधांमध्ये आपल्याला अनेकदा तणाव आणि मतभेदाने भरलेल्या परिस्थितीतून जावे लागते. अशा वेळी एखाद्या ब्रेकची गरज असते, तज्ज्ञ सांगतात...
Relationship Tips : नातं निर्माण करणं जितकं सोपं आहे, तितकंच ते टिकवून ठेवणे अत्यंत कठीण आहे. आयुष्यातील सर्वात मोठे कठीण काम म्हणजे नातेसंबंध टिकवून ठेवणे. मग ते कोणतंही नातं असो.. कौटुंबिक संबंध असो.. किंवा आपले प्रेमसंबंध... नातेसंबंधांमध्ये आपल्याला अनेकदा तणाव आणि मतभेदाने भरलेल्या परिस्थितीतून जावे लागते. तज्ज्ञ सांगतात, अशा वेळी एखाद्या ब्रेकची गरज असते, पण जेव्हा आपण ब्रेकचा विचार करतो, तेव्हा आपल्याला नेमकं काय करायचंय हे माहित नसते. आज आम्ही याबद्दल बोलणार आहोत जर तुम्ही कपल असाल आणि तुमच्यामध्ये सर्व काही सामान्य होत नसेल तर तुमच्यासाठी ब्रेक किती आवश्यक आहे? कोणती पावले उचलणे योग्य किंवा नाही? जाणून घ्या..
नात्याच्या कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितीत, एक लहान ब्रेक तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल पुन्हा विचार करण्यासाठी आणि पुढे कसे जायचे हे समजून घेण्यासाठी वेळ देते. सर्टीफाईड नातेसंबंध प्रशिक्षक, अलेक्झांड्रा यांनी त्यांच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये, आपल्या नातेसंबंधातून ब्रेक घेताना आपण काय लक्षात ठेवावे याबद्दल तीन टिप्स दिल्या आहेत.
View this post on Instagram
तुमच्यासाठी ब्रेक म्हणजे काय ते जाणून घ्या?
ब्रेक घेण्यामागे जशी वेगवेगळी कारणे आहेत, तशीच रिलेशनशिपमधून ब्रेक घेण्याची वेगवेगळी स्पष्टीकरणे आहेत. ब्रेकचा अर्थ काय आहे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. अशा ब्रेकची काही उदाहरणे जाणून घ्या
ब्रेक घेण्यामागे तुमचा हेतू?
ब्रेक घेण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत तुमचे हेतू स्पष्ट करावे लागतील. हे तुम्हाला योग्य दिशा शोधण्यात मदत करेल आणि तुम्ही दोघेही ब्रेकचा योग्य फायदा घेऊ शकाल. अलेक्झांड्राने याची काही उदाहरणेही दिली आहेत.
-मला वाटते की मी तुझ्या आयुष्यात इतकी गुंतली आहे आणि म्हणूनच मी स्वतःबद्दल विचार करणे विसरली आहे. त्यामुळे मला स्वत:ला योग्य दिशेने आणण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.
-आमचे महत्त्वाच्या गोष्टींबाबत एकमत नाही आणि मला काय हवे आहे किंवा काय करायचे आहे यासाठी मी या वेळेचा उपयोग करू इच्छितो.
-मी तुझ्यावर प्रेम करत असलो तरी माझ्या शंका, माझे शब्द आणि माझे विचार आमच्या नात्याला आणखीनच कमकुवत करत आहेत, त्यामुळे मला थोडा वेळ काढायचा आहे, जेणेकरून आम्ही आमचे नाते पुन्हा मजबूत करू शकू.
तुमच्या नात्याची टाइमलाइन ठरवा
ब्रेक घेण्यापूर्वी, तुम्ही ब्रेक कधी संपवाल आणि रिलेशनशिपमध्ये परत याल हे ठरवणे फार महत्वाचे आहे. कारण या अनिश्चिततेमुळे इतरांबद्दल शंका, नाराजी आणि निराशा होऊ शकते. निश्चित टाइमलाइनशिवाय, तुमचे नाते टिकून राहणे तसे अवघड आहे
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Relationship Tips : तुम्हालाही सतत जोडीदार गमावण्याची भीती वाटते? रिलेशनशिपमध्ये असुरक्षित वाटते? तज्ज्ञांकडून कारणे जाणून घ्या