Relationship Tips : तुम्हालाही सतत जोडीदार गमावण्याची भीती वाटते? रिलेशनशिपमध्ये असुरक्षित वाटते? तज्ज्ञांकडून कारणे जाणून घ्या
Relationship Tips : तुमचा जोडीदार गमावण्याची भीती देखील तुमच्या नात्यात असुरक्षितता वाढवण्याचे कारण असू शकते. नातं असुरक्षित वाटण्याची मुख्य कारणे जाणून घ्या.
Relationship Tips : प्रेमाचं नातं हे अत्यंत नाजूक असतं, एखादं नातं तोडायला जितका वेळ लागत नाही, तितकंच ते जोडायला वेळ लागतो. कोणतेही नाते तेव्हाच मजबूत होते जेव्हा ते टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जातात. नातेसंबंधात चढ-उतार असणे सामान्य आहे, परंतु ते यशस्वी करण्यासाठी, दोन्ही जोडीदारांनी सहकार्य करणे सर्वात महत्वाचे आहे. अशात काही लोकांना सतत जोडीदार गमावण्याची भीती वाटत असते. नात्यात नेहमी असुरक्षितता वाटते? याचं नेमकं कारण काय असू शकतं? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
नात्यात असुरक्षितता का वाटते?
नातेसंबंधात विश्वास एखाद्या ढालीप्रमाणे म्हणून काम करत असतो, नातेसंबंधात असुरक्षिततेची भावना देखील नाते कमकुवत होण्यास कारणीभूत ठरू शकते. जोडीदारावर वारंवार शंका घेणे, जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे किंवा जोडीदार गमावण्याची भीती यामुळेही नात्यात असुरक्षितता वाढते. पण नात्यात असुरक्षितता वाढण्यामागे मुख्य कोणती कारणे असू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? जोडीदाराला असुरक्षित वाटत आहे की नाही हे कसे शोधायचे? ओन्ली माय हेल्थ वृत्तसंस्थेच्या बातमीत सायकॉलॉजिस्ट नीलम मिश्रा यांनी याबाबत माहिती दिलीय. ती जाणून घेऊया
तुमचा पार्टनर असुरक्षित असण्याचे संकेत काय असू शकतात?
-कोणत्याही कारणाशिवाय जोडीदार वारंवार शंका घेत असेल तर ते त्याच्या असुरक्षिततेचे लक्षण असू शकते.
-छोट्या छोट्या गोष्टींबद्दल ईर्ष्या वाटणे हे देखील तुमच्या जोडीदाराच्या असुरक्षिततेचे कारण असू शकते.
-जर जोडीदाराने अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा जास्त बंधने लादली तर हे देखील जोडीदाराच्या असुरक्षिततेचे कारण असू शकते.
नात्यात लोकांना पुन्हा पुन्हा असुरक्षित का वाटू लागते?
भूतकाळातील वाईट अनुभव
एखाद्या व्यक्तीला भूतकाळात नातेसंबंधांमध्ये वाईट अनुभव आले असतील, तर यामुळे देखील त्यांना नात्यात असुरक्षित वाटू शकते. अशा स्थितीत नात्यात फसवणूक होण्याची किंवा नातेसंबंध संपुष्टात येण्याची भीती व्यक्तीला राहते.
वारंवार विश्वास गमावणे
वारंवार विश्वास गमावणे देखील भागीदार असुरक्षित बनू शकते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवणे खूप कठीण होऊन बसते. यामुळे ती व्यक्ती आपल्या जोडीदारावर वारंवार संशय घेऊ लागते किंवा त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते.
नात्यात सतत मतभेद
जर अनेक दिवसांपासून नात्यात भांडणे किंवा मतभेद होत असतील तर यामुळे पार्टनर असुरक्षित होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला नाते संपुष्टात येण्याची भीती राहते आणि तो आपल्या जोडीदाराला आवर घालू लागतो.
अधिक पझेसिव्ह
काही लोक आपल्या जोडीदाराशी खूप जोडलेले असतात, अशा परिस्थितीत ते त्यांच्याबद्दल अधिक पझेसिव्ह होतात. यामुळे जोडीदारालाही असुरक्षित वाटू शकते.
दोघांना बसून बोलण्याची गरज
जर तुमच्या जोडीदारालाही तुमच्याबद्दल असुरक्षित वाटत असेल, तर तुम्हाला दोघांना बसून बोलण्याची गरज भासू शकते. तुमच्या जोडीदाराला नात्याबद्दल असुरक्षित का वाटते याचे कारण तुम्हाला जाणून घ्यावे लागेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Relationship Tips : 'कधीतरी पतीच्याही भावना समजून घ्या की...' नवऱ्याला पत्नीकडून नेमकं काय हवं असतं? 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या