Red Planet Day 2022: मंगळ ग्रहाशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये! 28 नोव्हेंबर विशेष का आहे? जाणून घ्या कारण
Red Planet Day 2022: आज मंगळाच्या अनेक रंजक आणि महत्त्वाच्या तथ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्हाला बरीच मनोरंजक माहिती मिळेल.
Red Planet Day 2022 : मंगळ (Mars) हा सूर्याभोवती (Sun) फिरणारा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याचा आकार पृथ्वीच्या निम्मा आहे. जेव्हा मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवण्यास यश मिळविले. त्यानंतर मंगळ ग्रह जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माणसाची उत्सुकता वाढू लागली. त्यानंतर अनेक दशकांपासून, मानवाने सतत मंगळावर अनेक अंतराळयान पाठवत संशोधन केले आहे. आज मंगळाच्या अनेक रंजक आणि महत्त्वाच्या तथ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्हाला बरीच मनोरंजक माहिती मिळेल.
28 नोव्हेंबर विशेष का आहे?
मंगळ ग्रह हा लाल ग्रह म्हणूनही ओळखला जातो. 28 नोव्हेंबर हा दिवस खूप खास मानला जातो. कारण या दिवशी प्रथमच या ग्रहासाठी मोहीम प्रक्षेपित करण्यात आली होती. 28 नोव्हेंबर 1964 रोजी नासाचे मरिनर 4 अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर, 28 नोव्हेंबरचा दिवस मंगळासाठी खूप खास बनला आणि तो लाल ग्रह दिवस म्हणून साजरा केला गेला. मंगळाचा उल्लेख करताच एक ग्रह आपल्या समोर येतो जिथे हवा नसते. जिथे वातावरणही धुळीने माखलेले आहे. जमीन खडबडीत आहे. या ग्रहावर लाखो किलोमीटर पसरलेले वाळवंट आहे. त्यात थंड तापमान आहे. याशिवाय ज्वालामुखी आणि ग्रँड कॅनियन सारखी परिस्थिती आहे.
मंगळ ग्रहाबद्दल मनोरंजक तथ्ये
1. मंगळ, जो Mars म्हणून प्रसिद्ध आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ग्रहांपैकी एक आहे. मंगळ हा लाल ग्रह म्हणूनही ओळखला जातो. बुधानंतर, मंगळ हा सौरमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल ,आपल्या पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागाची जाडी सुमारे 40 किलोमीटर आहे तर मंगळाचा पृष्ठभाग 50 ते 120 किलोमीटर जाड आहे.
2 जेव्हा आपण दुर्बिणीद्वारे पृथ्वीवरून मंगळ पाहतो तेव्हा तो लाल दिसतो. त्याच्या लाल रंगाचे कारण म्हणजे त्याच्या पृष्ठभागावर भरपूर लोह ऑक्साईड आहे, ज्यामुळे त्याला लाल रंग येतो. मंगळवरील वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे.
3. मंगळावर गुरुत्वाकर्षण देखील आहे. परंतु ते संथगतीने काम करते. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावरील गुरुत्वाकर्षण एक तृतीयांश म्हणजेच 1/3 आहे. मंगळावर एखादा दगड पडला तर तो खूप धीम्या गतीने पडेल.
4. पृथ्वीच्या तुलनेत मंगळाला सूर्याची एक फेरी पूर्ण करण्यासाठी दुप्पट वेळ लागतो
5. तुम्हाला माहिती आहे का? की सुमारे चारशे दशलक्ष वर्षांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाण्याची चिन्हे सापडली आहेत. नासा शास्त्रज्ञांच्या मते, मंगळाच्या पृष्ठभागावर इतके पाणी होते की, त्यामुळे ग्रहाच्या संपूर्ण पृष्ठभागावर 1500 मीटर खोल महासागर तयार झाला असता. पण या ग्रहावरील चुंबकीय शक्ती संपुष्टात आल्याने मंगळाचे वातावरण संपुष्टात येऊ लागले आणि हळूहळू लाखो वर्षांत मंगळावरील पाणी कमी होऊ लागले
6. जर आपण मंगळावर उभे राहून आकाशाकडे पाहिले तर आपल्याला फोबोस आणि डेमोस हे चंद्र दिसतील. फोबोस आकाराने डायमोसपेक्षा मोठा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ग्रीक भाषेत फोबोसचा अर्थ "भय" आहे, म्हणून ग्रीक लोक मंगळ ग्रहाला भीतीचा देव म्हणतात. तसेच या उपग्रहाला शुक्राचा पुत्र देखील म्हटले गेले.
7. असे मानले जाते की फोबोस उपग्रह मंगळाच्या दिशेने हळूहळू झुकत आहे. तो 100 वर्षांत मंगळाच्या दिशेने 1.8 मीटरने झुकतो. नासाच्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की 50 दशलक्ष वर्षांनंतर तो मंगळावर आदळेल आणि तुटेल.
8. फोबोस उपग्रहावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या 1000 पट आहे. जर पृथ्वीवर एखाद्या वस्तूचे वजन 70 किलो असेल, तर फोबोसवर त्याचे वजन फक्त 70 ग्रॅम असेल.
7. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मंगळाचा एक दिवस 24 तास 39 मिनिटे 35 सेकंद इतका असतो. याशिवाय मंगळावरील 1 वर्ष हे 687 दिवस आणि 23 महिन्यांचे असते. याशिवाय मंगळाचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे 142 दशलक्ष मैल आहे.
8.जर आपण तापमानाबद्दल बोललो, तर मंगळावरील सरासरी तापमान - 55 ° से आणि हिवाळ्यात ते - 87 ° से होते आणि उन्हाळ्यात ते उणे -5 ° से होते. याशिवाय आपल्या पृथ्वीप्रमाणे मंगळावरही ऋतू आढळतात. परंतु त्यांचा काळ दुप्पट असतो.
9. सध्या मंगळावर 12 मानवनिर्मित वस्तू आहेत. याशिवाय या ग्रहावर एलियन्सची कवटी सापडल्याचेही लोकांचे म्हणणे आहे.
10. मंगळाचा शेजारचा ग्रह, ज्याला आपण गुरू म्हणून देखील ओळखतो, त्याच्या प्रचंड आकारामुळे मंगळाचे संरक्षण होतो. याशिवाय तुम्हाला माहीत आहे का? की मार्च महिन्याचे नाव मंगळ ग्रहावरून पडले आहे.
11. मंगळावर जाणारे पहिले अंतराळ यान 10 ऑक्टोबर 1960 रोजी प्रक्षेपित करण्यात आले, यानंतर सोव्हिएत युनियनने सुमारे 5 मोहिमा केल्या, त्या सर्व अयशस्वी ठरल्या. शेवटी, 28 नोव्हेंबर 1964 रोजी, नासाने मंगळावर मरिनर 4 मोहीम सुरू केली, जी पूर्णपणे यशस्वी झाली.
12. तुम्हाला माहिती आहे का? की मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी एकूण 49 मोहिमा करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये अमेरिकेच्या नासाला सर्वाधिक यश मिळाले आहे. आणि एक मिशन मंगलयान-1 भारताने 2014 मध्ये पूर्ण केले. या मोहिमेत भारताला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. तसेच मंगळाचा सूर्याभोवती फिरण्याचा सरासरी वेग 14.5 मैल प्रति सेकंद इतका आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीपासून मंगळावर जाण्यासाठी पूर्ण 2.5 वर्षे लागतात.
13. तुमच्यासाठी मंगळाविषयी ही गोष्ट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की, सूर्यमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखीचा पर्वत मंगळावरच आहे. जो Olympus Mons या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या लांबीबद्दल बोलायचे तर, हा 21 किमी उंच आणि 600 किमी व्यासाचा ज्वालामुखी आहे, जो लाखो वर्षांपूर्वी तयार झाला होता.
14. मंगळावरून दररोज संध्याकाळी सूर्य निळा दिसतो. सूर्यमालेतील सर्वात लांब आणि खोल दरी मंगळावर अस्तित्वात आहे, तिचे नाव व्हॅलेस मरिनेरिस आहे. या खोऱ्याची लांबी 4000 किमी आणि रुंदी 2000 किमी आणि खोली 7 किमी आहे.
15. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO), 24 सप्टेंबर 2014 रोजी त्यांची पहिली अंतराळ मोहीम (मार्स ऑर्बिटर मिशन) सुरक्षितपणे पूर्ण केली. तसेच त्याची किंमत नासाच्या मिशनपेक्षा खूपच कमी होती. यासह मंगळावर पोहोचणारा भारत हा आशियातील पहिला देश ठरला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत अंतराळयान ठेवणारा जगातील पहिला देश ठरला. दरम्यान, हे मिशन 5 नोव्हेंबर 2013 रोजी लाँच करण्यात आले होते.
16. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2030 च्या अखेरीस, नासाची मंगळावर एक छोटी स्वतंत्र वसाहत तयार करण्याची योजना आहे.
17. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची स्वतःची एक मोठी स्पेस कंपनी आहे. जो स्पेस एक्स या नावाने प्रसिद्ध आहे. मस्क हे "स्पेस एक्स" चे सीईओ आहेत आणि 2026 मध्ये मंगळावर एक छोटेसे जग निर्माण करण्याचा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि जर सर्व काही त्यांच्या योजनेनुसार पूर्ण झाले तर 2024 मध्येही हे पराक्रम निश्चित केले जाऊ शकतात.