एक्स्प्लोर

Bakari Eid 2023 : यंदाच्या बकरी ईदला बनवा तोंडाला पाणी सुटेल असा मटण कलेजी मसाला आणि मटण कोरमा रेसिपी

मुस्लfम बांधवांचा आवडता सण ईदला आज सुरूवात झाली आहे. या सणाला बनवा मसालेदार रेसेपी.

Recepies For Bakari Eid : मुस्लिम बांधवांचा आवडता सण ईदला नुकतीच सुरूवात झाली आहे. या सणाला सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात एकमेकांना भेटतात. याच निमित्ताने अनेक लोक आपल्या घरात गोडधोड पदार्थ तसेच काही तिखट पदार्थ बनवतात. ज्या लोकांना खूप खायला आवडते ते लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. ईदच्या मुहूर्तावर अश्याच  मटण कलेजी मसाला आणि मटण कोरमाची खमंग रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  या दोनही डिश ईद दिवशी आवर्जून बनवल्या  जातात. कशा बनवल्या जातात या रेसेपी जाणून घ्या.

मटण कलेजी मसाला सामग्री

500 ग्रॅम कलेजी
1/2 कप कांदा
1/2 कप टोमॅटो
1.5 टेबलस्पून मिक्स मसाला
1/2 टीस्पून हळद
1 टिस्पून गरम मसाला
2 टेबलस्पून आललसूण मिरची कोथिंबीर पेस्ट
2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे वाटण
2 टीस्पून मीठ
तुकडा फोडणीत टाकण्यासाठी..1 तमालपत्र, दालचीनी
3 टेबलस्पून तेल
2 टेबलस्पून कोथिंबीर

मटण कलेजी मसाला बनवण्याची रेसेपी

स्टेप 1

कांदा,टोमॅटो चिरून घ्या. सुके खोबरे भाजून वाटून घ्या.आललसूण मिरची कोथिंबीर पेस्ट करून घ्या.माझ्याकडे नेहमी वाटलेले असते.

स्टेप 2

आता कढईत किंवा घाई असेल तर छोटा कुकर घ्या. तेल घाला तापले की तमालपत्र, दालचिनी घाला, कांद्याला लालसर परतून घ्या, आता त्यात सर्व मसाले वाटणे घाला आणि परता. नंतर टोमॅटो घाला नी मऊ होईपर्यंत शिजवा.शेवटी कलेजी घाला परतून घ्या नी वाफेवर शिजवायला ठेवा किंवा थोड्याचवेळात कुकरमधे असेच शिजवून थोडे पाणी घालून 3 शिट्ट्या घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.

स्टेप 3

मटण कलेजी मसाला तयार आहे नुसतीच स्टार्टर म्हणून खा किंवा चपाती, भाकरी बरोबर खाऊ छान लागते.

मटण कोरमा बनवण्याची सामग्री

1/2 किलो मटण
गरम मसाला मध्ये
काळी मिरी सात ते आठ
4 मोठी विलायची
2 टेबलस्पून धने
1 टेबलस्पून जीरे
6 ते सात लवंग
1 टेबलस्पून खसखस
1 टेब स्पून मगज बी
1 तुकडा दालचिनीखसखस एक चमचा
2 तमालपत्रएक जावित्री
1 जावित्री
4 कांदे
कोथिंबीर
1 चमचा कसुरी मेथी
1 टेबलस्पून केवडा वॉटर
7 ते आठ केशर काड्या
1/2 वाटी दही
5 ते सहा काजू

मटण कोरमा बनवण्याची रेसेपी

स्टेप 1

गरम पाण्यामध्ये केशर काड्या भिजत घाला.

स्टेप 2

सर्व गरम मसाले पॅनमध्ये गरम करून मिक्सरला वाटून घ्या.

स्टेप 3

मटण स्वच्छ धुऊन निथळत ठेवा.

स्टेप 4

दोन कांदे चिरून घ्या पातेल्यामध्ये तेल तापत ठेवा यामध्ये थोडेसे जीरे टाका चिरलेला कांदा घाला कांदा थोडासा फ्राय झाल्यावर मटण घालून परता. यामध्ये मीठ घाला झाकण ठेवून मटण शिजू द्या.

स्टेप 5

एका वाटीमध्ये दही घ्या त्यामध्ये लाल तिखट हळद धने पूड घाला हे मिश्रण मिक्स करून मटणामध्ये ओता चमच्याने सतत हलवत रहा मटण शिजायला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागतील किंवा कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घ्या.

स्टेप 6

आता व भिजवलेल्या केशर काड्या चे पाणी यामध्ये ओता.

स्टेप 7

मटण शिजले का चेक करा वरून बारीक केलेला गरम मसाला घाला एक चमचा काजू आणि मगज बी ची पेस्ट घाला. त्यावर झाकण ठेवा. वरून कोथिंबीर घाला थोडसं गरम पाणी घालून शिजू द्या तुम्हाला जशी करी हवी आहे त्या प्रमाणात पाणी घाला.

स्टेप 8

आता यावर एक चमचा कसुरी मेथी घाला परत झाकण ठेवून दोन मिनिटं शिजू द्या वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

स्टेप 9

गरमागरम लखनवी मटण कोरमा चपाती रोटी बरोबर सर्व्ह करा.

इतर महत्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा उपवासाची 'ही' रेसिपी; लहानांपासून मोठे खातील आवडीने, पाहा रेसिपी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget