Rat Killer Home Remedy : घरात उंदीर शिरलेत? 2 रुपयांचा शॅम्पू सर्व उंदीर पळवून लावेल, एकदा 'हा' उपाय करुन पाहाच!
Undir Palun Lavnyasathi Upay: घरात नासधूस करणाऱ्या उंदराला घरातून पळवून लावण्यासाठी सर्व उपाय करुन थकलात, पण तो काही जात नाहीय, तर मग आज आम्ही एक उपाय सांगतो, तो करुन पाहा.
Rat Killer Home Remedy : एवढुसा उंदीर (Rats), पण त्रास इतका देतो की, विचारु नका. हा उंदीर जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये शिरलाच, तर मग तुमचं काहीच खरं नाही. उंदीर घरात शिरला म्हणजे, नुकसान आणि नासधूस ठरलेलीच. घरातील सामना कुरतडणं, किचनमध्ये असलेले अन्नपदार्थांचे पॅकेट्स किंवा डब्ब्याची नासधूस करणं, हे जणू त्यांचं आवडतं काम. हाच उंदीर जर तुमच्या कपाटात शिरला तर तुमच्या कपड्यांचं आणि तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचं काही खरं नाही. घरातून उंदीर पळवून (Rat Killer Home Remedy) लावण्यासाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध असतात. पण त्यांचा काहीच उपयोग होत नाही. हे उंदीर त्या सर्व औषधांच्या नाकावर टिच्चून घरातली नासधूस सुरूच ठेवतात.
घरात नासधूस करणाऱ्या उंदराला घरातून पळवून लावण्यासाठी सर्व उपाय करुन थकलात, पण तो काही जात नाहीय, तर मग आज आम्ही एक उपाय सांगतो, तो करुन पाहा. यासाठी तुम्हाला फार पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. फक्त 2 रुपयांचं शॅम्पूचं पाकिट लागेल. तुम्ही खर्च केलेले 2 रुपये उंदीर पळून लावण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. जाणून घेऊयात काय आहे उपाय?
उंदरांना पळवून लावण्यासाठी 2 रुपयांच्या शॅम्पूचा उपाय
- आज आपण उंदीर पळवून लावण्याच्या उपायाबाबत बोलणार आहोत. त्यासाठी एक लहान रुमाल, एक लहान वाटी, एक ते दीड चमचा गव्हाचं पीठ, कापराचे तुकडे, लाल मिरची पावडर आणि एक 2 रुपयांच्या शॅम्पूचं पाकिट, आता एका वाटीत दीड चमचा पीठ घ्या आणि त्यामध्ये थोडी लाल मिरची पावडर आणि पाणी टाकून मिश्रण एकत्र करा. मिश्रण व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये 2 रुपयांच्या शॅम्पूचं पाकिट टाका आणि पुन्हा मिश्रण एकजीव करुन घ्या.
- आता एक रुमाल घ्या , एखाद्या ब्रशच्या मदतीनं मिश्रण रुमालावर पसरवून घ्या. परंतु, असं करताना हातात ग्लव्स घाला. मिश्रणात मिरची पावडर असल्यानं हातांना जळजळ होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. नंतर कापूर घेऊन त्याचा चुरा करून रुमालावर सर्वत्र शिंपडा. मग तुम्ही हे कापड ज्या ठिकाणी उंदीर फार नासधूस करतात, त्या ठिकाणी ठेवा. आता जेव्हा उंदीर तिथे येतील, तेव्हा ते खाण्याचा प्रयत्न करतील, त्यांनी ते खाल्यानंतर जळजळ होईल, त्यामुळे ते बाहेर पळून जातील.
- तुम्ही तंबाखूच्या (Tambaku) मदतीनंही उंदरांना पळवून लावू शकता. त्यासाठी गव्हाचं पीठ किंवा बेसनातं पीठ घ्या आणि त्यात तंबाखू एकत्र करा. या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या तयार करा. जिथे उंदीर नासधूस करतात, त्या ठिकाणी ठेवा. उंदीर येतील मिश्रण खातील आणि घरातून बाहेर पळून जातील.
- उंदरांना तुरटी अजिबात आवडत नाही. तुरटीचा खडा तुमची उंदरांची समस्या कायमची दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. तसेच, तुम्ही तुरटीची पावडर पाण्यात मिसळून उंदराच्या बिळाजवळ शिंपडा आणि बघा. कसे चुटकीसरशी पळून जातील उंदीर.
- उंदरांना पळवून लावण्यासाठी कांदा (Onion) अत्यंत उपयोगी ठरेल. कांद्याचा गंध उदरांना अजिबात आवडत नाही. जिथे उंदीर जास्त हैदोस घालतात, त्या ठिकाणी कांद्याचे 7 ते 8 तुकडे ठेवा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :