Rakshabandhan 2024 : रक्षाबंधनला दिसाल सुंदर, हेवी मेकअप आवडत नसेल, तर 'असा' No Makeup लुक ट्राय करा...
Rakshabandhan 2024 : सध्या पावसाळा सुरू आहे. यावेळी मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पावसाळ्यात हेवी मेकअप केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.
Rakshabandhan 2024 : ज्या दिवसाची भाऊ-बहिण अगदी आतुरतेने वाट पाहतात, तो रक्षाबंधनाचा (Rakshabandhan Makeup Look) सण आज देशभरात साजरा होत आहे. तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक बहिणीला या सणाची खूप उत्सुकता असते. या दिवसासाठी ती तिचे कपडे,ज्वेलरी, हेअरस्टाईल, मेकअप लूक अशा गोष्टी अनेक दिवस आधीच निवडते. कारण रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना तिला सर्वात सुंदर दिसायचं असतं. कारण कपड्यांसोबतच दागिने, फूटवेअर आणि मेकअप देखील खूप खास आहेत.
रक्षाबंधन सोबत पाऊस सुद्धा... मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवा
सध्या पावसाळा सुरू आहे. अशा परिस्थितीत मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पावसाळ्यात जड मेकअप केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. यामुळे हलका मेकअप करायचा असेल तर 'नो मेकअप' लुक करा. येथे आम्ही तुम्हाला नो मेकअप लुक करण्याचा योग्य मार्ग सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही सुंदर दिसाल आणि हेवी मेकअपमुळे गोंधळूनही जाणार नाही. आजकाल नो मेकअप लूक ट्रेंडमध्ये आहे, तसेच तो चेहऱ्यावर खूप चांगला दिसतो.
स्वच्छ चेहरा
नो मेकअप लूकमध्ये दिसण्यासाठी, सर्वप्रथम चेहरा चांगल्या फेसवॉशने धुवा, जेणेकरून त्वचेवरील सर्व घाण आणि तेल निघून जाईल. लक्षात ठेवा की ते तुमच्या त्वचेच्या प्रकाराचे असावे.
मॉइश्चरायझर लावा
तुमचा चेहरा कोरडा होऊ नये म्हणून, ते हायड्रेटेड ठेवण्यासाठी हलके मॉइश्चरायझर लावा. जर तुमची त्वचा कोरडी दिसत असेल तर ते तुमचा लुक देखील खराब करू शकते.
सनस्क्रीन लावा
पावसाळा सुरू असला तरी त्वचेला सनस्क्रीन लावा. हे तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी काम करेल.
बीबी क्रीम
नो मेकअप लुकमध्ये तुम्हाला फाउंडेशनची गरज भासणार नाही. तुमच्या त्वचेवर थोडेसे बीबी क्रीम लावा आणि मग त्याचे स्वरूप पाहा. लक्षात ठेवा की बीबी क्रीमचे प्रमाण खूपच कमी असावे.
ब्लश आणि हायलाइटर
जर तुम्ही हेवी बेस लावत नसाल तर ब्लश आणि हायलाइटर जरा जपून वापरा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि तुम्ही सुंदर दिसाल.
गुलाबी लिप बाम
ओठ मऊ ठेवण्यासाठी गुलाबी लिप बाम वापरा. ज्यामुळे तुमचे ओठ नैसर्गिक गुलाबी दिसतील.
हेही वाचा>>>
Rakshabandhan Mehandi : भावाला ओवाळताना हात दिसतील सुंदर अन् गोंडस! रक्षाबंधननिमित्त 'या' मेहंदी डिझाइन ट्राय करा, फोटो येतील छान
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )